Bharat Ratna Lata Mangeshkar passes away भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन
Bharat Ratna Lata Mangeshkar passes away । मुंबई : भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं आज वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं. मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
लता दीदींना न्युमोनियाची लागण झाली होती. तसंच त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल देखील पॉझिटीव्ह आला होता. कोरोनातून त्या बऱ्या देखील झाल्या होत्या. पण न्युमोनियाची लागण झालेली असल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. (Bharat Ratna Lata Mangeshkar passes away)
गेल्या आठ दशकांहून अधिक काळ संगीत विश्वावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘सुरांनी’ विराम घेतला. भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 93 व्या वर्षी लतादीदींनी जगाचा निरोप घेतला. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर जवळपास महिनाभर त्या हॉस्पिटलमध्ये होत्या. लतादीदी उपचाराला प्रतिसादही देत होत्या, मात्र लतादीदींची तब्येत शनिवारी अचानक बिघडली होती. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक मात्र स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. मात्र रविवारी सकाळी 8.12 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
रविवारी सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी लता मंगेशकर यांचे निधन झाले, अशी माहिती ब्रीच कँडी रुग्णालयतील डॉक्टर प्रतीत समदानी यांनी दिली. कोव्हिडची लागण झाल्यापासून 28 दिवसांहून अधिक कालावधीनंतर अवयव निकामी झाल्याने त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. (Bharat Ratna Lata Mangeshkar passes away)
लता दीदींना २००१ साली संगीत क्षेत्रातील देदीप्यमान कामगिरीबद्दल ‘भारतरत्न’ या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पद्मविभूषण, पद्मभूषण, महाराष्ट्र भूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार यांसह असंख्य पुरस्कारांनी गौरविण्यात आलं आहे. १९९२ मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने लता मंगेशकर यांच्या नावाने लता मंगेशकर पुरस्कार नावानेही पुरस्काराचीही सुरुवात केली. तर मध्य प्रदेश सरकरानेही १९८४ सालापासून लता मंगेशकर पुरस्कार देण्याची परंपरा सुरू केली. (Bharat Ratna Lata Mangeshkar passes away)