“आपण जिवंत आहोत यापेक्षा मोठी कोणतीच गोष्ट या जगात नाही” : युनुस सय्यद
गेल्या एक वर्षापासून कॅन्सरशी लढत असलेला युनुस सय्यद (Yunus Sayyed) सांगतोय आपला अनुभव.. तो म्हणतोय, 4 फेब्रुवारी हा जगभरात ‘जागतिक कॅन्सर दिवस (‘World Cancer Day) म्हणून पाळला जातो. एक कॅन्सर रुग्ण म्हणून मला माझा कॅन्सर विरोधातला लढा थोडक्यात मांडायचा आहे. (“There is nothing greater in this world than we are alive.”)
मागच्या वर्षी याच दिवशी मी ICU मध्ये उपचार घेत होतो. जगेल की मरेल, याची कोणताही शाश्वती नव्हती. समोर मृत्यू दिसत होता. श्वास बंद होत चालला होता. त्याचवेळी मी मृत्यूशी अखेरच्या श्वासापर्यंत लढायला स्वतःला तयार होतो. मागच्या वर्षीची कॅन्सर दिनाची थीम होती “I am and I will” याच शब्दांनी मला खरतर कॅन्सर विरोधात लढण्याची प्रेरणा दिली (Inspired to fight cancer) आणि आता माझा लढा यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे.
सुरुवात थोडक्यात सांगायची तर मी नगर जिल्ह्यातील एका आदिवासीबहुल खेडे गावातून अधिकारी होण्याचं स्वप्न घेऊन पुण्यात शिक्षणासाठी गेलो होतो. घरी आई दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरी करून कमवत होती व आम्हा चार भावंडाना सांभाळत होती. पुण्यात मिळेल ते काम करून फर्ग्युसन कॉलेजमध्ये (Ferguson College) शिकत होतो. (“There is nothing greater in this world than we are alive.”)
लॉकडाऊन (Lockdown) लागल्यावर घरी गेलो. अभ्यासासोबत काम म्हणून जवळील एका कंपनीत सेक्युरिटी गार्डचे (Security guard) काम करत होतो. हळूहळू आजारी पडत गेलो. ताप येणे, भूक न लागणे, चक्कर येणे, मळमळ, उलट्या, ई. लक्षणं दिसू लागल्याने हॉस्पिटल मध्ये दाखल झालो. तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी (By the doctor) थोड घाबरतच सांगितलं की तुम्हाला कॅन्सर आहे. अगोदर विश्वास बसणे कठीण होत.कारण मी प्रत्येक बाबतीत फिटनेस ची विशेष काळजी घेत होतो अन् लाईफस्टाईल (Lifestyle) खूप व्यवस्थीत होती.
मुंबई (Mumbai) मध्ये कॅन्सरचा (Cancer) उपचार करण्याचा आम्ही निर्णय घेतला होता. माझ्यासोबत फक्त माझी आई होती. आम्ही मुंबईत 10 बाय 10 च्या पत्र्याची खोलीत झोपडपट्टीमध्ये भाड्याने राहून उपचार घेत होते. माझी केमोथेरपी सुरू झाली होती अन् ती आठ नऊ महिने चालणार होती.
डॉक्टरांनी सुरुवातीलाच अशा काही गोष्टी सांगितल्या होत्या की, त्या ऐकून आमचा धीर खचला. ते म्हणाले की, आम्ही उपचार पूर्ण होईपर्यंत काहीच सांगू शकत नाही. मी मात्र हिम्मत हारली नाही. पैसे नसले तरी प्रत्येक गोष्टीला तोंड देण्याची आमची तयारी होती. मला, त्रास इतका असायचा की व्हीलचेअर (Wheelchair) वर बसवून हॉस्पिटल (Hospital) मध्ये फिरवावा लागायचं.
मुंबईत उपचार सुरू होऊन एक महिना पूर्ण झाला होता. एक दिवस केमो झाला अन् खोकला, ताप यायला लागला. मला तर उठता बसता पण येत नव्हत नीट. आईने कसबस मला बसवल. माझा जीव कासावीस होत होता. मला असं वाटत होत की कोणीतरी माझ्या छातीत सारखं सारखं चाकू घुसवतय अन् काढतय. मला भयंकर वेदना होत होत्या.
मला डॉक्टरांनी चेक केलं अन् ICU मधे टाकले. रात्रीचे 3 वाजले होते. मला ऑक्सीजन, व्हेंटिलेटर लावण्यात आले. डॉक्टरांनी आईला सर्जिकल, मेडिकल आणायला लावले ज्याच बिल 70 हजार झालं होत. पण आईकडे पैसे नव्हते. आई पैशासाठी अक्षरशः भीक मागत होती. शेवटी डॉक्टरांनी क्रेडिट वर मेडिकल द्यायला सांगितले.
माझ्या नाकातोंडात नळ्या घातल्या गेल्या व शरीरावर सगळीकडे ECG च्या वायरी लावल्या गेल्या. माझ्या सर्व वेईन कोलाप्स झाल्या होत्या. माझ सर्व शरीर सूई ने टोचून झालं. पण आय.व्ही. लाईन टाकता आली नाही म्हणून गळ्याची एक अन् हाताची एक नस कापली व तीन सलाईन एकच वेळी सुरू झाल्या. (“There is nothing greater in this world than we are alive.”)
कधीकधी वाटायचं की, आता मी मरतो की काय कारण ज्या वेदना होत्या त्या शेवटच्या टोकाच्या व मृत्यूच्या अगोदरच्या अशा होत्या. त्या वेदनानंतर जर काय असेल तर तो म्हणजे फक्त मृत्यू. माझा जेव्हा सिटी स्कॅन काढले गेले तेव्हा माझे एक फुफुस अर्धाच दिसत होत कारण एवढं त्यात रक्त-पाणी झालं होत. मला फंगल इन्फेक्शन झालं होत.
खोकला दिवसरात्र सुरूच होता. खोकलो की रक्त बाहेर पडत होतं. छाती इतकी दुखत होती की पुढचा एक महिना मी फक्त बेडवर बसून होतो. मला झोपता येत नव्हतं. माणूस दोन दिवस झोपला नाय तर पुढचे दोन दिवस खराब जातात. पण मी कितीतरी दिवस फक्त बसून होतो. झोप न झाल्यामुळे मला भ्रम व्हायचे व काही काळासाठी माझी स्मृतिभ्रंश व्हायची. त्यातच माझी बोन मरो टेस्ट केली. मणक्यात अन् कमरेत इंजेक्शन दिले. पाय तीनपट सुजले होते.
हातापायाची कातडे गेली होती. काही दिवसांसाठी तर डोळ्याची नजर अन् आवाज पण गेला होता. हातापायाच्या नखातून रक्त यायच व खूप वेदना व्हायच्या. गाल अन् ओठ आतून फाटून रक्त येत होते. पाणी पिताना पण खूप त्रास होत होता. पाच मिनट मला पाच वर्षांसारखे वाटत होते. जेवण बंद होत. ओन्ली लिक्वीड डाएट.
फंगल इन्फेक्शन बर होत नाही की, लगेच मला कोविड झाला. डॉक्टर व माझे मित्र खूप काळजीत पडले. त्यांना वाटले आता काही खर नाही युनूसच. तेव्हा मी त्यांना म्हणायचो की, “अरे मला कॅन्सर काहीच करू शकत नाय तर हा न दिसणारा को काय करणार?”
कोरोनाची दुसरी लाट आलेली. पुन्हा लॉकडाऊन लागलेलं. अशात मला लागणाऱ्या डाएटच्या वस्तू मिळायच्या नाय. लॉकडाऊन मुळे मुंबईत राहताना खूप अडचणी वाढल्या. (“There is nothing greater in this world than we are alive.”)
कोरोना मधून नीट झालो की मला डायबिटीस झाला. शुगर आवाक्यात आणण्यात एक महिना गेला. शुगर कंट्रोल मध्ये आली की कांजण्या आल्या. कांजण्या बऱ्या होण्यात पंधरा दिवस गेले. (“There is nothing greater in this world than we are alive.”)
मुंबईत पत्र्याच्या खोलीत राहत होतो, म्हणून उन्हाळ्यात इतकं गरम व्हायचं की त्याच्याने केमो चे साईड इफेक्ट्स अजून जास्त व्हायचे. (“There is nothing greater in this world than we are alive.”)
त्रास अन् वेदना इतक्या व्हायच्या की कधीकधी सहन नाय व्हायचं. एक दिवस एक वर्षासारखा वाटायचा. वाटायचं मेलेल बरं पण आईचा चेहरा आणि माझ्यासाठी घेतलेला त्रास पाहून एक नवी जगण्याची ऊर्जा मिळायची.
त्या काळात फक्त कोरोना ने किती तरी जण जात होते. अशा काळात मी कॅन्सरग्रस्त होतो. मला कॅन्सर मध्ये कावीळ, फंगल निमोनिया, कोरोना, डायबिटीस, कांजण्या, केमो- रेडिएशन चे साईड इफेक्ट्स, लॉकडाऊन, पैशांची अन् राहण्याची अडचण, असह्य वेदना, ई. होऊनसुद्धा मी हिम्मत हारलो नाय. मी पूर्ण ताकदीनिशी कॅन्सरशी लढलो आणि लढत आहे.
डॉक्टरांनी सांगितले होते की 40 टक्के जाणण्याचा चान्स आहे. तेव्हा मी म्हणालो होतो की, “सर जर 1 टक्का जरी चान्स असेल ना तर मी त्या 1 टक्क्या मध्ये असेल हे वाचलेत, त्या 99 टक्क्या मध्ये नसेल ने मरण पावलेत.”
माझ्या शरीरात 86% कॅन्सर पसरला होता. आमच्याकडे ना पैसा होता ना कोणाचं मार्गदर्शन तरी पण मी अजून जिवंत आहे. कारण फक्त एकच की काही झालं तरी मला जगायचंय हे मी स्वतः ला सांगितले होत. माझ्या सोबतचे उपचार घेणारे बरेच जण आज या जगात नाहीयेत. त्याच खूप वाईट वाटतंय.
मला खूप लोकांनी मदत केली. हा माझा पुनर्जन्म आहे. माझ्या आईने माझा लहान मुलासारखा सांभाळ करून मला पुन्हा एकदा जन्म दिलाय. पण यावेळी तिला जास्त त्रास झाला. डॉक्टर, नर्स, स्टाफ, ई. सर्वांमुळे मी आज आपल्यात आहे.
या प्रवासात काय शिकलो
1) जगातला सर्वात मोठा संघर्ष म्हणजे एखाद्या क्षेत्रात यशस्वी होणे हा नसून स्वतःला जिवंत ठेवणे हा आहे.
2) आपण जिवंत आहोत यापेक्षा मोठी कोणतीच गोष्ट या जगात नाही, कारण माझ्यासोबत चे बरेच जण गेले.
3) जगात तुमचं कुटुंब तुमचं सर्वस्व आहे, कारण तुमच्या शेवटच्या अन् वाईट काळात तेच सोबत असते म्हणून घरच्यांशी नीट वागा.
4) मोठ्यांचे आशिर्वाद व तुम्ही लोकांसाठी केलेले चांगल काम याचा मोबदला तुम्हाला नक्की मिळतो. जर तुम्ही कोणाविषयी एक चांगला विचार केला तर जगात त्याचवेळी कमीत कमी चार जण तुमच्याविषयी चांगला विचार करत असतात.
5) वेदना ही एकमेव गोष्ट आहे जी सांगते तुम्ही जिवंत आहात नायतर मेलेल्या माणसाला जळताना पण त्रास होत नाय. म्हणून शारीरिक वेदना या मानसिक वेदना सहन करायला शिकवतात.
शेवटी एकच सांगायचंय, “Cancer is curable if detected and treated early because there is always CAN in Cancer. Close the care gap.”