विद्यार्थ्यांना शिष्यवृती अर्ज करण्यास 15 फेब्रुवारीपर्यत मुदत

नांदेड : जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नवीन अर्ज नोंदणी व नुतनीकरणासाठी मंगळवार 15 फेब्रुवारी पर्यत मुदत आहे. (The last date for students to apply for the scholarship is February 15)

गुंठेवारीत बांधलेले घर होणार नियमित, पण भरावे लागेल शुल्क

सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात महाविद्यालयातील प्रवेशीत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृतीचे अर्ज www.mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर मुदतीत करावेत. त्यानंतर त्या अर्जाची छायांकित प्रत आवश्यक कागदपत्रांसह महाविद्यालयात सादर करावी. महाविद्यालयातील प्रवेशित पात्र विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्ज भरावेत, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे. (The last date for students to apply for the scholarship is February 15)

वाईन विक्रीची चर्चा । राज्य सरकारने उत्पादनात शुल्कात केली मोठी वाढ

 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, नांदेड या कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृती व शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना तसेच व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना निर्वाहभत्ता या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासन मान्य अनुदानित/विनाअनुदानीत/कायमविना अनुदानीत महाविद्यालयातील सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृतीचे अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन महाडीबीटी पोर्टल सुरु झालेले आहे, असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. (The last date for students to apply for the scholarship is February 15)

Local ad 1