इराणवर मात करत चायनीज तैपेई उपांत्यपूर्व फेरीत

नवी मुंबई :  चायनीज तैपेई संघाने एएफसी वुमन्स आशिया कप भारत २०२२ स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला. येथील डी वाय पाटील मैदानावर आज झालेल्या अ गटातील सामन्यात त्यांनी इराण रिपब्लिक संघाचा (Of the Republic of Iran team) ५-० गोलने धुव्वा उडवला. (Group A: Chinese Taipei sail past IR Iran to seal quarter-final berth)

 

 

लाई ली शिन (Lai Li Shin) हिने नोंदवलेली हॅटट्रिक (Hat trick) त्यांच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरली. शेन येन पिंग आणि वँग सिआंद हुएई या दोघींनी प्रत्येकी एकेक गोल नोंदवला. या विजयाने चायनीज तैपेई संघाने अ गटातून दुसऱ्या स्थानाने बाद फेरीतील प्रवेशावर शिक्कामोर्तब केले. (Group A: Chinese Taipei sail past IR Iran to seal quarter-final berth)

 

 

 

गटातील साखळी सामन्यात या दोन्ही संघांना यापूर्वी चीनकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. सामन्याला इराणने कमालीची वेगवान सुरवात केली. सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला इराणच्या मेलिका मोटेवल्ली हिने अफलातून हेडर केले. मात्र, ती चायनीज तैपेई संघाची गोलरक्षक चेंग सू यू हिला चकवू शकली नाही. चायनीज तैपेईने त्यांना तोडीसतोड उत्तर दिले. ली सिउ शिन हिने इराणच्या बचावफळीला चकवून सुरेख किक दिली. ती लई हिने अतिशय सुरेख क्लिअर केली आणि डाव्या बगलेतून चेंडूला जाळीची दिशा दिली. सामन्याच्या २१व्या मिनिटाला इराणला बरोबरी साधण्याची चांगली संधी मिळाली होती. पण, अफसानेह चात्रेनूर हिची किक पुन्हा एकदा गोलरक्षक चेंग हिने अफलातून अडवली. त्यानंतर फातेम अमिनेह हिचे हेडरही व्यर्थ ठरले. (Group A: Chinese Taipei sail past IR Iran to seal quarter-final berth)

सामन्याच्या ३१ व्या मिनिटाला चायनीज तैपेई संघाने आपली आघाडी वाढवली. कर्णधारल लई हिची क्रॉस किक इराणची गोलरक्षक झोहरेह खोडाई हिच्या डोक्यावरून नेटमध्ये गेली. मध्यंतराला पाच मिनिटे बाकी असताना शेन येन पिंग हिने चायनीज तैपोई संघाचा तिसरा गोल केला. त्यानंतर लगोलग ची टिंग हिने स्वत:ला गोल करण्याची सुरेख जागा निर्माण केली होती. पण, तिचा प्रयत्न फसला. तिची किक गोलपोस्टच्या बाहेर गेली. या पाठोपाठच्या आक्रमणाने इराण संघ अधिकच दडपणाखाली आला. त्यामुळे त्यांच्या खेळात चुका होऊ लागल्या. सामन्याच्या ६३व्या मिनिटाला मोटेवल्ली हिने सु यू सुआन हिला धोकादायक पद्धतीने अडवले आणि रेफ्रींनी चायनीज तैपेईला पेनल्टी बहाल केली. ही संधी सत्कारणी लावताना लई हिने आपली हॅटट्रिक पूर्ण करताना संघाचा चौथा गोल केला.

सामन्याच्या ७८व्या मिनिटाला राखीव खेळाडू म्हणून उतरलेल्या वँग सिआंग हुएई हिने चायनीज तैपेई संघाचा पाचवा गोल केला. याच आघाडीच्या जोरावर तैपेई संघाने आपला विजय आणि बाद फेरीतला प्रवेश निश्चित केला. (Group A: Chinese Taipei sail past IR Iran to seal quarter-final berth)

Local ad 1