नांदेड : नांदेड शहरासह ग्रामीण भागात कोरोना रुग्ण आढळत आहेत. धक्कादायक म्हणजे 100 जणांच्या कोरोना चाचण्या केल्यानंतर 34 हुन अधिक लोक बाधित आले आहेत. त्यामुळे नांदेडकरांची चिंता वाढली आहे. नांदेड जिल्ह्यात बुधवारी दोन हजार 211 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातील तब्बल 758 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. त्यात नांदेड महापालिका क्षेत्रातील 467 रुग्ण असून, 475 जणांना डिस्चार्ज देण्यात आले आहे. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. (Shocking: Corona affected rate in Nanded district is 34%)
जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 211 अहवालापैकी 758 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 681 तर अँटिजेन तपासणीद्वारे 11 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 95 हजार 413 एवढी झाली असून यातील 89 हजार 374 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 3 हजार 383 रुग्ण उपचार घेत असून यात 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
Related Posts
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे किनवट तालुक्यातील सावरगावतांडा येथील 54 वर्षे वयाच्या पुरुषाचा 17 जानेवारी रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 656 एवढी आहे. (Shocking: Corona affected rate in Nanded district is 34%)
आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 455, नांदेड ग्रामीण 61, भोकर 1, देगलूर 4, धर्माबाद 6, कंधार 12, हदगाव 3, किनवट 37, लोहा 26, मुदखेड 11, मुखेड 12, नायगाव 1, उमरी 3, बिलोली 1, माहूर 4, परभणी 13, अमरावती 6, उमरखेड 1, हैद्राबाद 7, लातूर 1, नंदुरबार 1, अकोला 1, हिंगोली 14 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 12, नांदेड ग्रामीण 9, अर्धापूर 2, बिलोली 2, धर्माबाद 14, देगलूर 2, कंधार 2, माहूर 10, मुदखेड 10, मुखेड 10, नायगाव 3, उमरी 1 असे एकूण 758 कोरोना बाधित आढळले आहे. (Shocking: Corona affected rate in Nanded district is 34%)
आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 12, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 420, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 37, खाजगी रुग्णालय 5 असे एकुण 474 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. (Shocking: Corona affected rate in Nanded district is 34%)
शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 33, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 8, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 757, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 2 हजार 560, हदगाव कोविड रुग्णालय 1, खाजगी रुग्णालय 22, बिलोली कोविड रुग्णालय 2 असे एकुण 3 हजार 383 व्यक्ती उपचार घेत आहेत. (Shocking: Corona affected rate in Nanded district is 34%)
(Shocking: Corona affected rate in Nanded district is 34%)