शिवभक्ती पानपट्टे-मोरे यांचा काटकळंबा ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान
नांदेड : स्पर्धा परीक्षेच्या (Competitive examination) माध्यमातून शासकीय सेवेत (In government service) दाखल होणे कौतुकास्पद असून, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने अभियंतापदी (As an engineer) निवड झालेल्या शिवभक्ती सुभाष पानपट्टे-मोरे यांचा काटकळंबा ग्रामपंचायतच्या वतीने सन्मान करण्यात आला. (Shivbhakti Panpatte-More honored on behalf of Katkalamba Gram Panchayat)
स्पर्धा परीक्षेतील यशवंत, प्रज्ञा प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा सत्कार व्हावा आणि या सत्कारातून इतर विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन यश संपादन करावे, या सामाजिक बांधीलकीतून शिवभक्ती यांचा सन्मान करण्यात आला. पांचाली पतसंस्थेचे माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक सुभाषराव पानपट्टे यांची कन्या शिवभक्ती पानपट्टे-मोरे यांची स्पर्धा परिक्षेतून एमआयडीसीमध्ये सहायक अभियंता पदी निवड झाली. (Shivbhakti Panpatte-More honored on behalf of Katkalamba Gram Panchayat)
Related Posts
कार्यक्रमास माधवराव बस्वदे यांनी मार्गदर्शन केले. ग्राम पंचायतच्या स्तुत्य उपक्रमाच कौतुक करून ग्राम पंचायतचे काम युवा सरपंच शिवाजी दिगंबरराव वाकोरे सर यांच्या नेतृत्वात गावात अतिशय चांगली लोकोपयोगी कामे होत असून, यापुढे गावातील दहावी, बारावी, स्पर्धा परीक्षेतील सर्व यशवंत विद्यार्थ्यांचा मोठ्या स्वरूपात सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करावे, त्यामध्ये IAS/IPS अधिकारी यांचे मार्गदर्शन ठेवण्यात यावे, अशी सूचना केली. (Shivbhakti Panpatte-More honored on behalf of Katkalamba Gram Panchayat)