नांदेड जिल्ह्यात कोरोना रुग्णांत दररोज होतीय विक्रमी वाढ, आज किती सापडले वाचा…
नांदेड : जिल्ह्यात रविवारी प्राप्त झालेल्या दोन हजार 385 अहवालापैकी तब्बल 643 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. त्यात महापालिका हद्दीतील 364 रुग्ण असून, उर्वरित ग्रमीण भागातील आहे. तर 95 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकीकडे रुग्ण वाढत असले तरी, रुग्णालयात उपाचारासाठी दाखल होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. कोरोना प्रादुर्भाव होऊनये यासाठी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वताने करण्यात आले आहे. (Record increase in daily corona patients in Nanded district)
95 रुग्णांना दिला डिस्चार्ज
Related Posts
जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 818 अहवालापैकी 421 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 364 तर अँटिजेन तपासणीद्वारे 57 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 93 हजार 163 एवढी झाली असून यातील 88 हजार 288 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. जिल्ह्यात आजच्या घडीला 2 हजार 220 रुग्ण उपचार घेत असून 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 290, नांदेड ग्रामीण 17, भोकर 3, देगलूर 5, धर्माबाद 3, हिमायतनगर 1, कंधार 6, किनवट 1, लोहा 7, माहूर 1, मुदखेड 3, मुखेड 3, नायगाव 3, वाशीम 1, परभणी 6, हिंगोली 2, अकोला 1, अमरावती 1, जालना 2, पुणे 1, यवतमाळ 1, गडचिरोली 1, मुंबई 1, हैद्राबाद 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 17, नांदेड ग्रामीण 1, अर्धापूर 2, भोकर 1, बिलोली 11, देगलूर 1, धर्माबाद 1, हदगाव 1, किनवट 3, माहूर 1, मुदखेड 4, मुखेड 11, नायगाव 3 असे एकूण 421 कोरोना बाधित आढळले आहे. आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 3, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 53, खाजगी रुग्णालय 3, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 3 कोरोना बाधिताला औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली. (Record increase in daily corona patients in Nanded district)
जिल्ह्यात 2220 सक्रीय रुग्ण
आज 2 हजार 220 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 18, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 6, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 477, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 1 हजार 697, खाजगी रुग्णालय 22 अशा एकुण 2 हजार 220 व्यक्ती उपचार घेत आहेत. (Record increase in daily corona patients in Nanded district)