Maharashtra Corona Update : राज्यात दिवसभरात कोरोनाचे 44 हजारापेक्षा अधिक रुग्ण

मुंबई : आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात रविवारी 44 हजार 388 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 15 हजार 351 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. दरम्यान, ओमाक्रॉनची लागण झालेले दोनशेहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. सलग तिसऱ्या दिवशी 40 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत.  (More than 44,000 corona patients a day in the state )

 

मुंबईत रविवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली असली तर राज्यातील रुग्णसंख्या मात्र 45 हजाराच्या घरात पोहोचली आहे. आरोग्य विभागाने (Health Department) दिलेल्या माहितीनुसार राज्यात रविवारी 44 हजार 388 नवे कोरोना रुग्ण (Corona Patients) आढळून आले आहेत. तर 15 हजदार 351 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तसेच ओमाक्रॉनची लागण झालेले दोनशेहून अधिक रुग्ण आढळले आहेत. (More than 44,000 corona patients a day in the state )

 

 

राज्यातील मृत्यू दर 2.4 टक्क्यांवर पोहोचलाय. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.98 टक्के इतकं आहे. ज्यात आज रोजी 2 लाख 2 हजार 259 सक्रिय रुग्ण आहेत.त्यातील  2 हजार 614 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. (More than 44,000 corona patients a day in the state )

 

राज्यात आज 207 ओमिक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 155 रुग्णांचा अहवाल बी जे वैद्यकीय महाविद्यालय, तर 52 रुग्णांचा अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेनं दिलाय. महत्वाची बाब म्हणजे राज्यात आज सर्वाधिक ओमिक्रॉनबाधित रुग्ण हे सांगली जिल्ह्यात आढळून आले आहेत.  (More than 44,000 corona patients a day in the state )

Local ad 1