बुल्लीबाई अ‍ॅप । केंद्र सरकार मूग गिळून बसलंय का? : अ‍ॅड. आस्मा शेख

औरंगाबाद :  सुल्ली डील व बुल्लीबाई अ‍ॅपवरून (Bullibai App) मुस्लिम महिलांची बदनामी केली जात असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. या अ‍ॅपच्या निर्माता आणि चालकांविरुद्ध विविध ठिकाणी गुन्हे दाखल होत आहेत. आता  औरंगाबादच्या अ‍ॅड. आस्मा शेख यांनी गुन्हा दाखल केला आहे. (Bullibai app. Has the central government swallowed the moog? : Adv. Asma Sheikh)

 

 

 

शुक्रवारी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या तक्रारीविषयी सविस्तर भूमिका मांडली. या अ‍ॅपमुळे मुस्लिम महिलांना समाजात वावरणे असुरक्षित वाटत असून अ‍ॅप तयार कऱणारे आणि ते चालवणाऱ्यांविरोधात कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी  अ‍ॅड. आस्मा शेख केली आहे. (Bullibai app. Has the central government swallowed the moog? :  Adv. Asma Sheikh)

 

 

अ‍ॅड.अस्मा शेख म्हणाल्या, या अ‍ॅपवर 18 ते 70 वर्षांच्या महिलांचे फोटो अपलोड करून त्यांची बोली लावण्यात आली. अजित भारती या व्यक्तीने ट्विटरवरून ही माहिती दिली. मात्र 13 जुलै 2021 रोजी या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाकडे मी तक्रार दिली, मात्र अद्याप यावर कारवाई झालेली नाही. राज्यातही या प्रकरणी आवाज उठवण्यात आला.

 

औरंगाबादेत पोलीस आयुक्तांनी तक्रार दाखल करून घेतली. या अ‍ॅपमुळे महिलांना समाजात वावरणे असुरक्षित वाटत आहे, महिलांच्या स्वातंत्र्याला यामुळे बाधा पोहोचत आहे. किती महिलांचे फोटो यावर अपलोड केले आहेत, याची संपूर्ण माहिती अद्याप उपलब्ध नाही. पण ज्यांचे फोटो अशा पद्धतीने अ‍ॅपवर टाकले गेले असतील त्यांनी आवर्जून तक्रार दाखल करावी, असे आवाहन त्यांनी केले.  (Bullibai app. Has the central government swallowed the moog? :  Adv. Asma Sheikh)

 

दरम्यान, मुस्लिम महिलांची अशा प्रकारे बदनामी होत असताना केंद्र सरकार मूग गिळून बसले आहे का, आगामी पाच राज्यांती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार जाणीवपूर्वक केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. (Bullibai app. Has the central government swallowed the moog? : Adv. Asma Sheikh)

Local ad 1