Homes । सव्वाचार हजार जणांना मिळाले हक्काचे घर
पुणे : प्रत्येकाला हक्काचे घर मिळाले पाहिजे, हे महाविकास आघाडी सरकारचे धोरण असून, पुणे म्हाडाच्या ४ हजार २२२ नवीन सदनिकांची सोडत त्याच धोरणाच्या दिशेने पडलेले आश्वासक पाऊल आहे. सर्वांसाठी घरं हा कार्यक्रम महाविकास आघाडी सरकार प्राधान्याने राबविणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी दिली. (Four thousand 222 people got their rightful homes)
पुणे जिल्हा परिषदेच्या नवीन सभागृहात पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ अर्थात, पुणे म्हाडाच्या (Pune Housing and Area Development Board, of course, Pune MHADA) 4 हजार 222 नवीन सदनिकांची ऑनलाईन लॉटरी सोडतीच्या (Online lottery of flats) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
Related Posts
(Four thousand 222 people got their rightful homes)
पुणे विभाग पर्यटनामध्ये MTDC ठरला सरस
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते. उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झालेल्या या कार्यक्रमास गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील (Minister of State for Housing Satej Patil) व्हीसीद्वारे उपस्थित होते. पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे Pune Zilla Parishad President Nirmala Pansare, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर (Principal Secretary Housing Milind Mhaiskar), म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर, पुणे म्हाडाचे मुख्याधिकारी अधिकारी नितीन माने (Chief Officer of Pune MHADA Nitin Mane) आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.