कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार आणि लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देखमुख यांना कोरोनाची बाधा
MH टाईम्स वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांपसून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे. अनेक मंत्री, आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात आता कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Karjat-Jamkhed MLA Rohit Pawar) आणि लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे आमदार धिरज देशमुख (Latur Grameen MLA Dhiraj Dekhmukh) यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यंसदर्भातील माहिती रोहित पवार आणि धिरज देशमुख यांनी स्वःता सोशल मिडियावरुन दिली आहे. (Karjat-Jamkhed MLA Rohit Pawar and Latur Grameen MLA Dhiraj Dekhmukh obstructed by corona)
Nanded corona update । नांदेड जिल्ह्यात 10 व्यक्ती कोरोना बाधित
गेल्या चार दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून, आपण आता तिसऱ्या लाटेच्या उंबरओठ्यावर असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ओमायक्रॉनचा प्रसार मोठ्याप्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे. विधानसभेचे अधिवेशन आणि त्यानंतर भाजप नेते हर्षवर्धन पाटीली यांची मुलगी अंकिता पाटील यांच्या लग्नात सहभागी झालेल्या अनेक मंत्री आणि आमदारांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. (Karjat-Jamkhed MLA Rohit Pawar and Latur Grameen MLA Dhiraj Dekhmukh obstructed by corona)
तुमच्या सोबत त्याच्याशी लढत असताना गेली दोन वर्षे त्याला हुलकावणी देत होतो, पण अखेर त्याने मला गाठलंच. माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली. पण आपला आशीर्वाद असल्याने काळजीचं काही कारण नाही. माझ्या संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करून घ्यावी आणि काही लक्षणे असल्यास तातडीने उपचार घ्यावेत!
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 3, 2022
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात आमदार पवार यांनी “तुमच्या सोबत त्याच्याशी लढत असताना गेली दोन वर्षे त्याला हुलकावणी देत होतो, पण अखेर त्याने मला गाठलंच. माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली. पण आपला आशीर्वाद असल्याने काळजीचं काही कारण नाही. माझ्या संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करून घ्यावी आणि काही लक्षणे असल्यास तातडीने उपचार घ्यावेत!”, असे अवाहन फेसबुकर पोस्ट करत केले आहे. (Karjat-Jamkhed MLA Rohit Pawar and Latur Grameen MLA Dhiraj Dekhmukh obstructed by corona)
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्याने सध्या मी पुढील उपचार घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे माझी तब्येत चांगली आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.
— Dhiraj V Deshmukh (@MeDeshmukh) January 3, 2022