राज्याची डोकेदुखी वाढली ; शुक्रवारी कोरोनाचा विस्फोट, किती रुग्ण वाढले ?
MH टाईम्स वृत्तसेवा : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा उद्रेक वाढू लागला असून, सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी कोरोनाने राज्याला सर्वात मोठा दणका दिला आहे. शुक्रवारी दिवसभरात 8 हजार 67 नवे रूग्ण आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तसेच राज्यात ओमिक्रॉनचे 4 रूग्ण आढळून आले आहेत. (State headaches increased ; Corona eruption on Friday, how many patients increased?)
New restrictions। नांदेड जिल्ह्यात लग्नात आता फक्त 50 लोकांनात परवानगी
राज्यात शुक्रवार दिवसभरात एकुण 1 हजार 766 रूग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 8 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राज्यात आज अखेर 1 लाख 75 हजार 592 व्यक्ती होम क्वारंटाईन मध्ये आहेत तर 1079 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यातील सक्रीय कोरोनाबाधितांची संख्या 24 हजार 509 इतकी झाली आहे. (State headaches increased; Corona eruption on Friday, how many patients increased?)
मुंबईत ओमायक्रोनचे आढळले ’इतके’ रुग्ण
राज्यात शुक्रवारी ओमिक्रॉनचे 4 रूग्ण आढळून आले. यामध्ये वसई विरार, नवी मुंबई, मीरा भाईंदर आणि पनवेल येथील ऐकेका रूग्णाचा समावेश आहे. राज्यात आज अखेर 454 ओमिक्रॉन रूग्ण आढळून आले आहेत. यातील 157 रूग्णांचे RTPCR अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडून देण्यात आले आहे. (State headaches increased; Corona eruption on Friday, how many patients increased?)
Koregaon Bhima। कोरेगांव भीमा येथील अभिवादन कार्यक्रमासाठी मार्गदर्शन सूचना जारी