मुंबई : राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच राज्य मंत्री मंडळाचे अधिवेशनात सुरू असून, त्यात राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्वीट करत याविषयी माहिती दिली आहे. वर्षा गायकवाड काल राज्याच्या अधिवेशनामध्ये उपस्थित असल्याने आता चिंता वाढली आहे. (Education Minister Varsh Gaikwad contracted corona)
आपल्या ट्वीटमध्ये वर्षाय गायकवाड म्हणतात, मला आज सकाळी कळलं की माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सोमवारी संध्याकाळपासून मला सौम्य लक्षणं जाणवू लागली आहेत. माझी प्रकृती सध्या स्थिर असून, मी विलगीकरणात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी खबरदारी घ्यावी, असं आवाहन केले आहे. (Education Minister Varsha Gaikwad contracted corona)