नांदेडच्या दोघांसह राज्यात 26 ओमीक्राॕनग्रस्त आढळले
मुंबई : राज्यात ओमीक्राॕनचे रुग्ण सापडत असतानाच दक्षिण आफ्रिकेतून आलेले दोघांना ओमीक्राॕनची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. नांदेडच्या दोघांसह 26 जणांना ओमीक्राॕनची बाधा झाली आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (A total of 26 Omicron patients have been identified in the state, including two from Nanded)
धक्कादायक : नांदेडमध्ये ओमीक्राॕनचा शिरकाव
सोमवारी ओमीक्राॕनची 26 जणांना बाधा झाली असून, त्यात मुंबईतील अकरा, पनवेल पाच, ठाणे महापालिका चार, नांदेड दोन तर नागपूर, पालघर, भिवंडी- निजामपूर महापालिका आणि पुणे ग्रामीण प्रत्येकी एक रुग आढळले आहे. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 167 झाली आहे. यामध्ये मुंबई 84, पिंपरी-चिंचवड 19, पुणे ग्रामीण 17, पुणे आणि ठाणे महापालिका प्रत्येकी सात, नागपूर तीन, कल्याण डोंबिवली, अहमदनगर व नांदेड प्रत्येकी दोन, बुलडाणा, लातूर, अहमदनगर, अकोला, वसई -विरार, नवी मुंबई, मीरा- भाईंदर, पालघर आणि भिवंडी- निजामपूर येथे प्रत्येकी एक रुग्ण ओमीक्राॕनग्रस्त आढळलेला आहे. 167 रुग्णापैकी 72 रुग्णांची RTPCR चाचणी निगेटिव्ह आली आहे. (A total of 26 Omicron patients have been identified in the state, including two from Nanded)
नांदेडच्या दोघांसह राज्यात 26 ओमीक्राॕनग्रस्त आढळले
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या तिघांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह ( Coronav Virus ) आले होते. त्यानंतर त्यांना हदगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचे नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्यापैकी दोघांचा अहवाल ओमायक्रॉन पॉझिटिव्ह (Omicron Variant in Nanded ) असल्याची माहिती सोमवारी आरोग्य विभागाने दिली. (A total of 26 Omicron patients have been identified in the state, including two from Nanded)