ओमायक्रॉनचा धोका : पुणे शहरासह जिल्ह्यात निर्बंधात वाढ
पुणे ः पुणे शहरासह राज्यात ओमायक्रॉन विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. ते टाळण्यासाठी राज्य शासनाच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Collector Dr. Rajesh Deshmukh) यांनी पुणे जिल्ह्यात निर्बंधात वाढ केली आहे. (Danger of Omaicron : Increased restrictions in districts including Pune city)
जिल्हाधिकारी यांनी पुणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रातील सर्व क्षेत्र ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत कार्यक्षेत्रात कोविड 19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत. तसेच पुणे व खडकी छावणी परिषद कार्यक्षेत्राचा समावेश पुणे महानगरपालिका हद्दीजवळ व देहुरोड छावणी परिषद कार्यक्षेत्राचा समावेश पिंपरी-चिंचवड महानगर पालिका (Pimpri-Chinchwad Municipal Corporation, Pune Municipal Corporation boundary and Dehurod Camp Council area)
हद्दीजवळील क्षेत्रात होत आहे. आणि ज्याअर्थी कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा प्रसार अलीकडेच जगभर अत्यंत वेगाने होत आहे. ओमायक्रॉन अमेरिका व युरोप खंडातील अनेक देशांमध्येही धोकादायकरीत्या वाढत आहे. (Danger of Omaicron: Increased restrictions in districts including Pune city)
महाराष्ट्र राज्यामध्ये आत्तापर्यंत ओमायक्रॉन बाधितांची संख्या 88 असल्याचे आढळले आहे. मायक्रॉनची लागण होण्याचे प्रमाण गत आठवडयामध्ये वाढल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये प्रथमच राज्यामध्ये दररोज 1000 हून अधिक कोरोना बाधीत व्यक्तींची नोंद झाली आहे. येत्या काही दिवसात नाताळ, लग्न सराई, इतर सणवार व नवीन वर्षांच्या स्वागताप्रीत्यर्थ लोकांची गर्दी होण्याची शक्यता अधिक आहे. बाधित व्यक्तींची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता सद्यस्थितील निर्बंधांपेक्षा अधिक निर्बंध लागू करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (Danger of Omaicron: Increased restrictions in districts including Pune city)
असे आहेत निर्बंध..
विवाह समारंभ बंद जागेमध्ये आयोजित करतेवेळी अधिकतम 100 उपस्थितांची मर्यादा पाळण्यात यावी. असे समारंभ मोकळया जागेमध्ये आयोजित करताना जास्तीत जास्त 250 व त्या ठिकाणच्या क्षमतेच्या 25% यापैकी जी संख्या कमी असेल इतक्या उपस्थितांच्या मर्यादेचे पालन करण्यात यावे. (Danger of Omaicron: Increased restrictions in districts including Pune city)
सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रमांमध्ये जेथे लोकांची सतत उपस्थिती राहील असे कार्यक्रम बंद जागेमध्ये आयोजित करतेवेळी अधिकतम 100 उपस्थितांची मर्यादा पाळण्यात यावी. असे समारंभ मोकळया जागेमध्ये आयोजित करताना जास्तीत जास्त 250 व त्याठिकाणाच्या क्षमतेच्या 25 % यापैकी जी संख्या कमी असेल इतक्या उपस्थितांच्या मर्यादेचे पालन करण्यात यावे. 24 वर नमूद केलेल्या कार्यक्रमांव्यतिरिक्त इतर कार्यक्रमांचे आयोजन बंद जागेमध्ये करीत असताना आसन व्यवस्था असलेल्या ठिकाणी त्याजागेच्या 50% क्षमतेइतक्या उपस्थितांच्या मर्यादेचे पालन करण्यात यावे. तसेच बंद जागेमध्ये परंतु आसन व्यवस्था नसलेल्या ठिकाणी असे कार्यक्रम आयोजित करीत असताना व आसन व्यवस्था त्याजागेच्या 25% क्षमतेइतक्या उपस्थितांच्या मर्यादेचे पालन करण्यात यावे, असे कार्यक्रम मोकळया जागेमध्ये आयोजित करताना त्याजागेच्या क्षमतेच्या 25% पेक्षा अधिक उपस्थिती राहाणार नाही याची दक्षता घ्यावी.
क्रीडास्पर्धा व सामन्यांचे आयोजन करताना प्रेक्षक क्षमतेच्या अधिकतम 25% उपस्थितीची मर्यादा पाळण्यात यावी. रेस्टॉरेट, जिम, स्पा, सिनेमा व नाटयगृहे (Restaurants, gyms, spas, cinemas and theaters) तेथील आसनक्षमतेच्या 50% मर्यादेच्या अधीन राहून सुरू ठेवण्यास मुभा राहील. परंतु तेथे एकूण आसनक्षमता व परवानगी देण्यात आलेली 50% क्षमता याबाबत सूचना फलक दर्शनी भागात प्रदर्शित करण्यात यावा. सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा अधिक व्यक्तींना रात्री 9.00 ते सकाळी 6.00 वाजेपर्यंत एकत्र येण्यास मज्जाव राहील. (Danger of Omaicron: Increased restrictions in districts including Pune city)
पुणे व खडकी छावणी परिषद पुणे व खडकी छावणी परिषद कार्यक्षेत्र पुणे महानगरपालिका हद्दीजवळ येत असल्याने तेथे आयुक्त, पुणे महानगरपालिका यांचे आदेशातील कोरोना निर्बंध विषयक अटी व शर्ती लागू राहतील.