New Year’s celebrations । नाताळ आणि नवीन वर्षाच्या सिलिब्रेशनवर निर्बंधाची टांगती तलवार

New Year’s celebrations । मुंबई : राज्यात कोरोना रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी कशाप्रकारे निर्बंध लावता येतील यावर गुरुवारी रात्री टास्क फोर्स (Task Force) सदस्यांची बैठक झाली. त्यात आगामी नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी (For Christmas and New Year’s greetings) आयोजित सिलिब्रेशन (Celebration) करण्यावर निर्बंध येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येेत आहे. यासंदर्भात आज नियमावली जाहिर केली जाणार आहे. (The sword of restraint hanging over Christmas and New Year’s celebrations)

 

Christmas। ‘ख्रिसमस’साठी गृह विभागाच्या ‘या’ आहेत मार्गदर्शक सूचना

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी मार्गदर्शन केले. आगामी नाताळ, नववर्ष स्वागत असे प्रसंग लक्षात घेऊन कमीतकमी गर्दी कशी होईल तसेच विवाह समारंभ, पार्ट्या या अनुषंगाने हॉटेल्स आणि उपाहारगृहात होणाऱ्या गर्दीवर कसे निर्बंध लावता येतील यादृष्टीने विस्तृत चर्चा करण्यात आली. यासंदर्भात आज नियमावली जाहीर केली जाणार आहे.

 

Local holidays। स्थानिक सुट्ट्या जाहीर, कधी असणार त्या सुट्या..

गुरुवारी रात्री दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत इतर राज्यांनी  लावलेल्या निर्बंधांवर तसेच युरोप, अमेरिकेत कोरोनाची वाढत्या संख्येवर चर्चा करण्यात आली. मुख्य सचिव देवशीष चक्रवर्ती (Chief Secretary Devashish Chakraborty), मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे (Chief Adviser to the Chief Minister Sitaram Kunte), मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह (Additional Chief Secretary to the Chief Minister Ashish Kumar Singh), मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे (Principal Secretary Vikas Kharge), मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार डॉ दीपक म्हैसेकर (Dr. Deepak Mhaisekar), मुबंई पालिका आयुक्त इकबालसिंह चहल (Mumbai Municipal Commissioner Iqbal Singh Chahal ), वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, टास्क फोर्सचे डॉ संजय ओक (Dr.Sanjay Oak of the Task Force), डॉ शशांक जोशी, डॉ अजित देसाई, डॉ राहुल पंडित आदी सहभागी झाले होते.
Local ad 1