नांदेड : नांदेडमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या तिघा जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या तिन्ही नागरिकांचे नमुने आता जिनोमिक सिक्वेन्सीनसाठी पुण्याच्या राष्ट्रीय प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आता ओमायक्रोनचा प्रवेशाची भीती व्यक्त करण्यात आली आहे. (Three corona positives from South Africa in Nanded)
परदेशातून आलेल्या नागरिकांची कसून तपासणी केली जात आहे. जिल्ह्यात गेल्या पंधरा ते वीस दिवसात परदेशातून ३०२ नागरिक आल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये ओमायक्रोनचा अतिधोका असणाऱ्या देशातून आलेल्या नागरिकांची संख्या अधिक आहे.
परदेशातून आलेले हे तीनशे दोन नागरिक आरोग्य विभागाच्या देखरेखीत आहेत. या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. यातील तिघाजणांना कोरोना झाल्याचे निदर्शनात आले आहे. या सर्वांची चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्यांना कोणतीही कोरोनाची लक्षणे नाहीत. आता या तिघांच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध घेतला जाणार आहे. (Three corona positives from South Africa in Nanded)