नऊ महिन्यांत 51 डीपी जाळले ; ग्रामस्थ धडकले महावितरण कार्यालयावर

कंधार : ग्रामीण भागात वीज कधी येते-कधी जाते याचा थांगपत्ता नसते. कंधार तालुक्यातील काटकंळबा गावातील ग्रामस्थ गेल्या नऊ महिन्यापासून विजेच्या समस्येचा सामना करत आहेत. महावितरण विभागाच्या दुर्लक्षामुळे गावातील काही भाग नेहमी अंधारात असतो. महावितरण विभागाला जागे करण्यासाठी घंटानाद आंदोलन केले आहे. आता चार दिवसांत वीज पुरवठा सुरळीत करू, असे आश्वासन दिले आहे. (Burned 51 dp in nine months; Villagers hit MSEDCL office)

 

 

 

मागील ९ महिण्या पासुन काटकंळबा येथे सतत ५१ डिपी जाळले. त्यामुळे संपूर्ण गावात वीजपुरवठा कधीच नसतो, एका भागातील वीजपुरवठा सुरळीत झाली की, दुसऱ्या भागातील डीपी जळतो. त्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.

 

 

गावातील सार्वजनिक पाणीपुरवठा विजेवर अवलंबून असून, वीज पुरवठा सुरळीत नसल्याने पाण्यासाठी नागरिकांना वणवण फिरावे लागते. विशेष म्हणजे गेल्या नऊ महिन्यात तब्बल 51 रोहित्र (सिंगल फेज डीपी) जाळले आहेत. काही डीपी तर दोन तास ही चालले नाहीत, त्यामुळे पुरवठा होत असलेल्या डीपीच्या गुणवत्तेवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहेत. (Burned 51 dp in nine months ; Villagers hit MSEDCL office)

 

 

ग्रामस्थ धडकले महावितरण कार्यालयावर 

 

गावातील वीज पुरवठा कायमचा सुरळीत व्हावा यासाठी सरपंच शिवाजी वाकोरे, साईनाथ कोळगिरे, ग्रामपंचायत सदस्य अशोक चावरे, वजीर पठाण, माधव वाकोरे, प्रतिनिधी माधव कांबळे, गजानन कुठरे यांनी महावितरण विभागाकडे सातत्याने लेखी व प्रत्यक्ष भेट घेऊन प्रयत्न केले. महावितरण विभागाने ही डीपी उपलब्ध करून दिले. मात्र, ते टिकत नाहीत. त्यामुळे कायमच प्रश्न सोडवा या मागणीसाठी ग्रामस्थ कंधार येथील महावितरणच्या कार्यालयावर धडकले. यावेळी भाऊसाहेब पानपट्टे, नवाज सय्यद आदी ग्रामस्थ सहभागी झाले होते. (Burned 51 dp in nine months; Villagers hit MSEDCL office)

 

 

आश्वासनानंतर आंदोलन मागे

वीजपुरवठा कायमचा सुरळीत व्हावा, तीन फेजचे डीपी बसवावे, जुन्या डीपीचे लोखंडी सांगळे कमकुवत झाले आहेत, ते नव्याने बसवावे, कंत्राटदाराची मनमानी थाबवा, अशा विविध मागण्यांसाठी महावितरणच्या कंधार उपकार्यकारी अभियाता कार्यालयापुढे उपोषण सुरू केले. मात्र, नव्याने रुजु झालेले उप कार्यकारी अभिंयाता जाधव यांनी चार दिवसांत वीज पुरवठा सुरळीत करू, असे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले, अशी माहिती सरपंच शिवाजी वाकोरे यांनी दिली.

 

 

Local ad 1