शेतकऱ्यांना दिवाळी गिफ्ट ; पीक विम्याची रक्कम सोमवारी होणार बँक खात्यावर जमा
नांदेड : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 7 लाख 35 हजार 811 शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची नोंद पिक विमा कंपनीकडे करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेत संरक्षण घेतले आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील मंजूर 461 कोटींचा परतावा सोमवारी (ता. आठ) शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. (Diwali gifts to farmers; The amount of crop insurance in the bank account will be on Monday)
नांदेड जिल्ह्यात यंदा सुरुवातीला पावसाने उघडीप दिली. त्यामुळे 50 टक्क्यांपर्यंत शेतीच्या उत्पादनात घट झाली. त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे होते तेही पीक वाया गेले. त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी नुकसानीचा ठरला आहे. संपुर्ण नांदेड जिल्ह्यासाठी 461 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला आहे. त्यात हदगाव तालुक्याला सर्वाधीक 61 कोटी, लोहा 53 कोटी तर किनवटला पाच कोटी परतावा मंजूर झाला आहे. (Diwali gifts to farmers; The amount of crop insurance in the bank account will be on Monday)
Ahmednagar district hospital । अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगित दहा कोरोना बाधितांचा मृत्यू