देगलूरमध्ये जितेश अंतपुरकर यांचा मोठ्या फरकाने विजय

देगलूर : आमदार रावसाहेब अंतपुरकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या देगलूर विधानसभा मतदारसंची पोटनिवडणूक लागली होती. त्यात काँग्रेसने अंतपुरकर यांचा मुलगा जितेश अंतपुरकर याला उमेदवारी दिली. भाजपने ऐनवेळी शिवसेनेचे सुभाष साबणे यांना रिंगणात उतरवलं. मंगळवारी मतमोजणी झाली त्यात जितेश यांनी साबणे यांचा दारुण पराभव केला आहे. (Jitesh Antpurkar wins by a big margin in Deglaur) 

 

*देगलूरमध्ये काँग्रेसच्या अंतापूरकरांची आघाडी कायम..*
*पहिल्या फेरीपासून ते 21 व्या फेरीपर्यंत कोणाला किती मते मिळाली सविस्तर वाचा* https://www.mhtimes.in/jitesh-antapurkar-of-mahavikas-aghadi-maintained/

 

 

जितेश अंतपुरकर यांनी पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांना एक लाख 8 हजार 840 तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे सुभाष साबणे यांना 66 हजार 872 मतांवर समाधान मानावे लागले. (Jitesh Antpurkar wins by a big margin in Deglaur)

 

 

 

देगलूर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत उमेदवार निहाय मिळालेली मते अशी आहेत. (Jitesh Antpurkar wins by a big margin in Deglaur)

जितेश अंतापूरकर – 1,08,789
सुभाष साबणे – 66,872
डॉ. उत्तम इंगोले – 11,347
विवेक सोनकांबळे – 465
नोटा – 1103

Local ad 1