Deglaur Assembly constituency : कोणाला किती मते मिळाली हा अंदाज बांधण्यात कार्यकर्ते व्यस्त
नांदेड : आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या देगलूर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली होती. (Deglaur Assembly constituency by-election) त्यासाठी शुक्रवारी मतदान झाले. ६३.९४ टक्के मतदान झाले असून, १२ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. सध्या कार्यकर्ते केंद्रनिहाय मते आपल्याला उमेदवाराला किती मिळतील याची अकडेमोड करण्यात व्यस्त आहेत. तर कोणाला किती मते मिळाली याचा निकाल २ नोव्हेंबर रोजी लागणार आहे. (Activists are busy guessing who got how many votes)
देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघात एकूण मतदान प्रक्रियेत पुरुष मतदाराची एकूण संख्या १ लाख ५४ हजार ९२, तर स्त्री मतदारांची एकूण संख्या १ लाख ४४ हजार २४६ आहे. इतर ५ (तृतीयपंथी) असे एकूण २ लाख ९८ हजार ३५३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार होते. त्यापैकी सकाळी ७ ते ११ दरम्यान २२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यानंतर दुपारी तीनपर्यंत ३१.२१ टक्के मतदान झाले. त्यात पुरुष मतदार ७३ हजार २१२, तर स्त्री मतदार ७१ हजार ३९० असे एकूण १ लाख ४४ हजार ६०२ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. (Deglaur Assembly constituency by-election)
काँग्रेस आणि भाजपने ही निवडणूक चुरसीची केली. त्यात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. उत्तम इंगोले यांच्या अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या प्रचार सभेमुळे भर पडली. मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैशांचा वापर केला जाऊ शकतो, याची चर्चा जोरदार सुरु होती. दरम्यान, केरूर येथे मतदारांना पैसे वाटप केल्याची तक्रार डॉ.उत्तम इंगोले यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे. (Deglaur Assembly constituency by-election)
शहरी व ग्रामीण भागात सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. प्रथमच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या तरुणांनी उत्साहात मतदानाचा हक्क आबालवृद्धानांही कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावर नेऊन मतदान करून घेतले. कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सचिन गिरी यांनी दिली. (Deglaur Assembly constituency by-election)