Dharmabad News । बेकायदा सावकारी करणाऱ्या धर्माबादच्या योगेश चौधरीला दणका

Dharmabad News । नांदेड : ग्रामीण भागात व्याजाने पैसे देऊन गरजू लोकांना लुटण्याचे काम राजरोसपणे केले जात आहे. ही अवैध सावकारी (Illegal lending) रोखण्यासाठी कायदा करण्यात आला असून, त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज आहे. धर्माबाद येथे अवैध सावकारी व्यवसाय केल्याबदल योगेश पांडुरंग चौधरी यांच्या विरूध्द धर्माबाद पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. (Yogesh Chaudhary of Dharmabad, who was involved in illegal lending)

 

 

धर्माबाद येथे योगेश चौधरी अवैध सावकारी व्यवसाय करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार 4 ऑक्टोबर रोजी चौधरीच्या घरावर छापा टाकला. त्यात 2008 ते 2021 या कालावधीतील शेकडा 3 ते 5 टक्के व्याज दराने रक्कमा दिल्याच्या नोंदी असलेल्या वह्या हिशोबाच्या चिट्टया आणि प्रामोसरी नोट इत्यादी कागदपत्रे आढळुन आले. (Yogesh Chaudhary of Dharmabad, who was involved in illegal lending)

 

*अखेर आर्यनसह तिघांना जामीन ; उद्या किंवा परवा येणार तुरुंगाबाहेर*

अखेर आर्यनसह तिघांना जामीन, उद्या किंवा परवा येणार तुरुंगाबाहेर

 

 

महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 चे कलम 39 अन्वये वैध अनुज्ञप्तीशिवाय सावकारीचा व्यवसाय करत असेल त्या व्यक्तीला कारावासाची किंवा द्रव्यदंडाची दोन्ही शिक्षा करण्यात येतील, अशी तरतूद आहे. ही कारवाई जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, विभागीय सहकारी संस्थेचे सहनिबंधक सचिन रावळ यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 7 जून 2021 च्या प्राप्त अर्जानुसार करण्यात आली आहे. (Yogesh Chaudhary of Dharmabad, who was involved in illegal lending)

Local ad 1