मिलिंद एकबोटे यांनी कोंढवाची बदनामी थांबवावी ः अजुंम इनामदार (Kondhwa’s notoriety on Milind Ekbote should be stopped)
पुणे ः मिलिंद एकबोटे हे गेल्या अनेक वर्षापासून मुस्लिमद्वेष मनात ठेवून काम करतात. कोंढवा जर मिनी पाकिस्तान “mini–Pakistan” असता तर त्याठिकाणी शिवसेना, भाजप व राष्ट्रवादीचे आमदार, नगरसेवक निवडून आले असते, का ?, मिलिंद एकबोटे यांनी कोंढव्याची बदनामी थांबवावी, अशी मागणी मूलनिवासी मुस्लीम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार यांनी केले. (Kondhwa’s notoriety on Milind Ekbote should be stopped)
मिलिंद एकबोटे यांनी कोंढव्यातील हज हऊसविषयी केलेले वक्तव्य हे निषेधार्य आहे. कोंढव्या विषयी बोलताना मिनी पाकिस्तान-मिनी पाकिस्तान दहशवाद्यांचा अड्डा, स्लिपर सेल (sleeper cells) अशा शब्दांचा उच्चार करतात. एकबोटे यांना पूर्ण कल्पना आहे, गेल्या पंधरा वर्ष शिवसेना पक्षाचे नगरसेवक महादेव बाबर मुस्लीम भागातून निवडून आले. 2005 ते 2010 पर्यंत शिवसेना पक्षाचे आमदारही महादेव बाबर होते. (Kondhwa’s notoriety on Milind Ekboten should be stopped)
2005 पूर्वी सूर्यकांत लोणकर यांनाही मते देऊन आमदार केले. त्यानंतर भाजपाचे योगेश टिळेकर आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे पाटलांनाही आमदार करण्यामध्ये मुस्लीम मतदारांचा मोलाचा वाटा आहे. जर का कोंढवा मिनी पाकिस्तान असता तर हे घडले असते का, याचा विचार ऐकबोटे यांनी केला पाहिजे, असे इनामदार यांनी म्हटले आहे. (Kondhwa’s notoriety on Milind Ekboten should be stopped)