सलग दुसऱ्या दिवशी आढळले पाच कोरोना बाधित

नांदेड : शनिवारी पाच कोरोना बाधित आढळले होते, तर रविवारीही पाच कोरोना बाधित आढळले. त्यामुळे पुन्हा कोरोना वाढती की, काय अशी भीती वाढत आहे. (Infected five corona found for the second day in a row)

 

 

रविवारी नांदेड जिल्ह्यात प्राप्त झालेल्या 684 अहवालापैकी 5 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 3 तर अँटिजेन तपासणीद्वारे 2 अहवाल बाधित आहेत. (Infected five corona found for the second day in a row)

 

 

जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 362 एवढी झाली असून यातील 87 हजार 685 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 25 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे.

 

 

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नागरिकांनी सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 652 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 3, देगलूर 1, किनवट 1 असे एकुण 5 बाधित आढळले. आज जिल्ह्यातील मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरणातील 3 कोरोना बाधिताला औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. आज 25 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 4, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 20, किनवट कोविड रुग्णालयात 1 व्यक्ती उपचार घेत आहेत. (Infected five corona found for the second day in a row)

Local ad 1