हेल्थकेअर क्षेत्रातील प्रशिक्षण मिळणार मोफत
Health training । पुणे : कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हेल्थकेअर क्षेत्रामध्ये कुशल मनुष्यबळाची उभारणी करण्याकरिता जिल्हयामध्ये सन 2021 साठी “प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 3.0 अंतर्गत हेल्थकेअर क्षेत्रविषयक विशेष प्रकल्प” राबविण्यात येत आहे, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता विभागाच्या सहायक आयुक्त अ. उ. पवार यांनी दिली. (Free health training in Pune)
आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असलेल्या १8 ते ४५ वयोगटातील युवक/ युवतींना हेल्थकेअर क्षेत्रामध्ये जिल्हयातील विविध शासकीय व खाजगी रुग्णालयात तसेच वैद्यकीय महाविद्यालयात कोविड फ्रंटलाईन वर्कर- सॅम्पल कलेक्शन सपोर्ट, इमर्जन्सी केअर सपोर्ट, होम केअर सपोर्ट, बेसिक केअर सपोर्ट, मेडीकल इक्विपमेंट सपोर्ट, ॲडव्हान्स केअर सपोर्ट अशा विविध 6 कोर्सचे प्रशिक्षण तसेच ऑन जॉब ट्रेनिंग देण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत देण्यात येणारे प्रशिक्षण हे उमेदवारांना पूर्णपणे नि:शुल्क असून, प्रशिक्षण पश्चात प्रमाणीकरणासह रोजगार देखील सहजपणे उपलब्ध होऊ शकतो. (Free health training in Pune)
कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता उमेदवारांनी https://forms.gle/cwncj2iBZuaSoin67 या लिंकवर उपलब्ध असणा-या गुगल फॉर्मच्या माध्यमातून आपली नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच नोंदणीसाठी ऑफलाईन फॉर्म जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, 481, रास्ता पेठ, पुणे या कार्यालयात उपलब्ध आहे.