नांदेड जिल्ह्यातील “या” मंडळात ढगफुटी !

नांदेड Cloudburst news : जिल्ह्यात सोमवार आणि मंगळावारी (Monday and Tuesday) झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नुकसानिचे पंचनामे केले जाणार असून, जिल्ह्यातील दहा महसूल मंडळात 100 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्याला ढगफुटी मानले जात आहे. हवामान क्षेत्रातील तज्ज्ञांनी (Meteorologist)  पुष्टी दिली आहे. Cloudburst in ten revenue boards in Nanded district!) 

 

नांदेड जिल्ह्यात दोन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी व इतर खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. सोमवारी 28 तर मंगळवारी 32 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. त्यात जिल्ह्यात सर्वाधिक 173 मिमी पावसाची  खानापूर महसूल मंडळात नोंद झाली आहे.

त्यापाठोपाठ माळाकोळी 156, कलंबर 137, रामतिर्थ 133, मुखेड 129, आदमपूर 123, जाहूर 114, लोहगाव 112, येवती 111, नरसी 109, शाहापूर 108, कुरुळा 107, चांडोळा 106, दिग्रस बुद्रुक 100 मिमी पाऊस झाला आहे. तसेच लोहा 98, शेवडी 95, पेठवडज 94, बारुळ 93, बिलोली 90, कंधार 90, फुलवळ 89,नरंगल बुद्रुक 89, सगरोळी 89, जांब 74, बार्हाळी 73, सोनखेड 69, कापसी बुद्रुक 67, नायगाव 67, कुंटूर 66, कुंडलवाडी 65, उस्माननगर 65 मिमी पाऊस झाला आहे. (Cloudburst in ten revenue boards in Nanded district!)

Local ad 1