नांदेड Nanded news : जिल्ह्यात मागील दोन- तिन दिवसांपासून अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. (Nanded district heavy rainfall) त्यामुळे नदी नाल्यांना पुर येऊन शेती क्षेत्राचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशावेळी विमा संरक्षित क्षेत्राला नुकसान भरपाई मिळणेसाठी झालेल्या नुकसानीची पुर्वसुचना संबधीत विमा कंपनीस (72 Give advance notice of crop loss to the concerned insurance company within 72 hours) तासामध्ये कळविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी केले आहे. (Nanded district collector dr vipin itankar)
प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत (Prime Minister’s Crop Insurance Scheme) विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भुस्खलन, गारपीट, ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गीक आग या नैसर्गीक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यामुळे होणारे अधिसुचित पिकांचे नुकसान हे वैयक्तिकस्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येते. या जोखीमेंतर्गत शेताचे क्षेत्र पडलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढून किंवा ओसंडुन वाहणारी विहिर किंवा पुराचे पाणी शेतात शिरून दिर्घकाळ जलमय राहिल्यामुळे शेती क्षेत्राचे नुकसान झाल्यास विमा कंपनीकडे नुकसान भरपाई दावा दाखल करता येतो. तथापी विमा दावा मंजूर होणेसाठी झालेल्या पीक नुकसानीची माहिती / पुर्वसुचना कंपनीस देणे गरजेचे आहे. (72 Give advance notice of crop loss to the concerned insurance company within 72 hours)