पीक विमाधारक शेतकर्‍यांना मिळणार विम्याची 25 टक्के आगाऊ रक्कम

नांदेड Nanded news :  पावसाने मोठा खंड दिल्याने खरीप पिकांच्या उत्पादनात 50 टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा (Pradhan mantri pik vima yojana kharip hangam 2021) उतरवला आहे. त्यांना विम्याची 25 टक्के रक्कम आगाऊ मिळणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी प्रतिकुल हवामान परिस्थिती (Mid-Season Adversity) अधिसुचना लागु केली आहे. त्यात 25 टक्के रक्कम आगाऊ देण्याची तरतूद आहे. (Farmers with Kharif insurance will get 25 percent of the sum insuredo) 

जिल्हयात 26 जुलै ते 16 ऑगस्ट या 21 दिवसाच्या कालावधीत पाऊस झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यात सोयाबीन आणि इतर खरीप पिकांचे नुकसान झाल्याची माहिती समितीने केलेल्या पाहणीत समोर आली आहे. जिल्हयातील सर्व तालुक्यांमध्ये पिकांच्या उत्पादकतेमध्ये 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असल्याचा अंदाज व्यक्त केला केला आहे. (Farmers with Kharif insurance will get 25 percent of the sum insuredo)

 

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर (Collector Dr. Vipin Itankar) यांनी जिल्हयातील सर्व तालुक्यांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना सन 2021-22 अंतर्गत प्रतिकुल हवामान परिस्थिती (Mid-Season Adversity) अधिसुचना लागु केली आहे. पुर, पावसातील खंड, दुष्काळ आदी बाबींमुळे शेतकर्‍यांच्या अपेक्षित उत्पन्नामध्ये सरासरी उत्पन्नाच्या 50 टक्के पेक्षा जास्त घट झाल्यास नुकसान भरपाईच्या प्रमाणात विमा धारक शेतकर्‍यांना 25 टक्के मर्यादेपर्यंत आगाऊ रक्कम देण्याची तरतूद आहे. त्यानुसार जिल्ह्यातील विमाधारक शेतकर्‍यांना याचा लाभ होणार आहे. (Farmers with Kharif insurance will get 25 percent of the sum insuredo)

Local ad 1