पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या “त्या” दोघांचे ‘मृ’तदेह आढळले

नांदेड Nanded news : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात दोघे वाहून गेले होते. त्यांचा शोध घेतला जात होता. एस डी आर एफ च्या टीमला पाचारण करण्यात आले होते. परंतु, ती टीम येण्यापूर्वीच दोन्ही ‘मृ’तदेह मिळाले आहेत, अशी माहिती प्रशासनाने दिली. (The bodies of the two were found washed away in the flood waters) 

 

जिल्ह्यात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे काही भागात नदी-नाल्यांना अचानक पूर आला होता. अचानक आलेल्या या पुरामुळे कंधार तालुक्यातील गगनबिड येथील (30 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 7.45 वाजता) 26 वर्षीय युवक उमेश रामराव मदेबैनवाड हा ओढयाच्या पाण्यात वाहून गेला होता. त्याचा शोध घेतला जात होता. बुधवारी सकाळी 11.30 वा. ऋषि मंदिराजवळ मन्याड नदीपात्राचे बॅक वॉटरमध्ये घटनास्थळापासून अंदाजे 3 किमी अंतरावर त्याचा मृतदेह  मिळाला असल्याची माहिती कंधार तहसिलदार (Kandahar Tehsildar) यांनी दिली. The bodies of the two were found washed away in the flood waters)

 

 

लोहा तालुक्यातील सावरगाव येथील पार्वतीबाई संभाजी दगडगावे या 30 ऑगस्ट 2021 रोजी पुराच्या पाण्यात ओढयात वाहून गेल्या होत्या. आज 1 सप्टेंबर 2021 रोजी त्र्यंबक धारबा जाधव यांच्या शेतात मालदरा जवळ दुपारी 1.45 वाजता घटनास्थळापासून 2 किमी अंतरावर त्यांचा मृतदेह मिळाला आहे, अशी माहिती लोहा तहसिलदार (Loha Tehsildar) यांनी दिली. (The bodies of the two were found washed away in the flood waters)

 

वरील दोन्ही घटनास्थळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी 31 ऑगस्ट रोजी भेट देवून शोध व बचाव कार्याला वेग येण्यासाठी मनपाच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्रातील शोध व बचाव पथक घटनास्थळी मदतीला पाठविले होते. त्यानंतर लगेच राज्य आपत्ती प्रतिसाद दल एसडीआरफ धुळे यांची मदत मागितली होती. परंतु ही टीम येण्यापुर्वीच दोन्ही मृतदेह मिळाले आहेत, असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे. (The bodies of the two were found washed away in the flood waters)

Local ad 1