अधिकारी दिसताच ‘न’वरदेवाने ठोकली धूम ; पोलिसांनी सिनेस्टाईल घेतलं ताब्यात

अवघ्या तेरा वर्षीय मुलीचा 'बा'लविवाह प्रशासनाने रोखला

नांदेड Nanded crime news : ‘बा’लविवाहमुळे होणारे दूरगामी परिणाम लक्षात घेऊन लग्नासाठी मुलीचे 18 तर मुलाचे 21 वर्ष असे निश्चित करण्यात आले. मात्र, अजूनही समाजात मुलींचा बालविवाह लावला जातो, असाच ‘बा’लविवाह  हदगाव  शहरात सुरू होता., परंतु प्रशासनाने ‘बा’लविवाह उधळून लावला आहे.  (District administration stopped child marriage in Hadgaon city) याप्रकरणी संबंधीत दोषींविरुध्द कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर (Nanded Collector Dr. Vipin Itankar) यांनी दिले आहे. 

 

हदगाव शहरामध्ये एका अल्ववयीन मुलीचा ‘बा’लविवाह होत असल्याची माहिती तहसील कार्यालय, पोलिस विभाग, बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना प्राप्त होताच त्यांनी घटनास्थळी धाव घेवून बाल विवाह रोखला, याप्रकरणातील अल्पवयीन मुलीचे वय 12 वर्ष 9 महिने आहे. (The underage girl is only 12 years and 9 months old) लग्नस्थळी अधिकारी येताच नवरदेवाने धूम ठोकली, मात्र, पोलिसांनी नवरदेवास सिनेस्टाईल पध्दतीने शोधून ताब्यात घेतले आहे. (Hadgaon police arrested Navradeva)

 

जिल्हाधिकारी यांना माहिती मिळताच त्यांनी संपूर्ण यंत्रणेला कामाला लावले. तसेच अल्पवयीन मुलीचे आईवडील व नवरदेव मुलाकडील मंडळी यांच्या रितसर जबाब नोंदवून घेऊन बाल विवाह घडवून आल्यास कायदेशीर कार्यवाही करण्याबाबतच्या सूचना दिल्या. मुलीची काळजी व सरंक्षण व बालिकेच्या भविष्यातील पुर्नवसाच्या दृष्टीने मुलीला बालकल्याण समिती नांदेड यांच्या समक्ष हजर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (District administration stopped child marriage in Hadgaon city)

 

यंत्रनेने तत्पर असावे

जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर यांनी बालविवाह प्रतिबंधासाठी मोहिम हाती घेतली. तसेच बाल विवाह रोखण्यासाठी जबाबदार घटकाचे आदेश निर्गमित करण्यात आले.तरीही छुप्या पध्दतीने बाल विवाह घडुन येत आहेत.असे बालविवाह होणार नाहीत यासाठी संबंधित यंत्रनेने तत्पर राहण्याचे आदेशही जिल्हाधिकारी यांनी दिले आहे.(District administration stopped child marriage in Hadgaon city)

 

या अधिकाऱ्यांनी केली कारवाई

बालविवाह रोखण्यासाठी तहसीलदार जिवराज डापकर, गटविकास अधिकारी केशव गड्डापोड, जिल्हा बालविकास अधिकारी डॉ.रशिद शेख, पोलिस निरिक्षक हणमंत गायकवाड, बाल विकास प्रकल्प अधिकारी उमेश मुदखेडे, महिला पोलिस उपनिरीक्षक संगीता कदम, पोलिस उपनिरिक्षक गोविंद खेरे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे, संरक्षण अधिकारी सोनारकर तसेच स्थानिक पोलिस विभाग स्थानीक प्रशासन यांनी सहकार्य केले. (District administration stopped child marriage in Hadgaon city)

Local ad 1