मुंबई : धनादेशाद्वारे (चेक) (Check payment) देवाण- घेवाण करणे हे विश्वासाचे मानलं जातं. सध्या अनेक, ऑनलाइन (Online payment) पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, व्यापारी लोक चेकद्वारेच देवाण -घेवाण करतात. आता यापुढे चेकच्या माध्यमातून पेमेंट करू इच्छित असाल काळजी घ्यायला हवी. कारण भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नियमात बद्दल केले आहेत. ते बदल काय आहेत, हे जाणुन घ्या..
रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI)ने बँकेच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. हे बदल 1 ऑगस्ट 2021 पासून लागू झाले आहेत.
नवीन बँकिंग नियमात RBI ने 24 तास आता बल्क क्लिअरिंग (check clearance) सुविधा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
त्याचा परिणाम तुमच्या चेक पेमेंटवर होणार आहे. सध्या चेक पेमेंट होण्याला 2 दिवसांचा वेळ लागतो.परंततु या नियमांनंतर 2 दिवसांचा वेळ लागणार नाही. म्हणजेच. त्यासाठी तुम्हाला बँकेच्या खात्यामध्ये पुरेसे पैसे ठेवावे लागतील. जर तुम्ही हा विचार करून चेक देत असाल की उद्या आपल्या खात्यात्या पैसे टाकू आणि आज चेक क्लिअरिंगला देऊ तर तुम्हाला दंड भरावा लागेल. चेक बॉउंस होऊ शकतो. म्हणून चेक देण्याआधी तुमच्या बँकेच्या खात्यातील रक्कम चेक करा मग चेक क्लिअरिंगला द्या.
रिझर्व बँकेने नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाउसला (NACH) आता 24 तास सातही दिवस चालु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे सर्व नियम सर्व राष्ट्रीयकृत आणि खासगी बँकांसाठी लागू असणार आहे. या नियमांमुळे सुट्टीच्या दिवशीही तुमचा चेक क्लिअर होणार आहे. (Check payment)