मोबाईलमध्ये “हे” नऊ अॅप्स असतील तर तुमचे फेसबुक खाते होऊ शकते हॅक
Facebook account can be hacked ः तुमच्या मोबाईलमध्ये असे अनेक अॅप्स असू शकतात, ज्यावर मालवेअरने सायबर हल्ला केला आहे. त्यामुळे तुमची गोपनीयता धोक्यात येण्याची शक्यता अधिक आहे. गूगलने अलीकडेच आपल्या प्लॅटफॉर्मवरून अशा 9 अॅप्सवर बंदी घातली आहे, (If there are nine apps, your Facebook account can be hacked) जी वापरकर्त्यांचा डेटा चोरत होती. तुम्ही जर ते अॅप्स वापरत असाल तर ते लगेच डिलीट करा.
फेसबुक खाते अनेकांचे हॅक होत असल्याचे प्रकार समोर येतात. अलीकडे, संशोधकांनी एक नवीन अँड्रॉइड ट्रोजन फ्लाईट्रॅप (Android Trojan Flytrap) शोधला आहे, ज्याद्वारे 140 पेक्षा जास्त देशांतील फेसबुक वापरकर्त्यांचे खाते हॅक (Facebook Account Hack) केली जात आहेत. हे अॅप डाउनलोड केल्यानंतर, ते यूजर्सना बरेच प्रश्न विचारले जातात. या सर्वांना उत्तर दिल्यानंतर, ते यूजर्सना फेसबुक लॉगिन करायला सांगतात. याचवेळी तुमचे फेसबुक खाचे हॅक केले जाते.
मालवेअर जावास्क्रिप्ट इंजेक्शन वापरते, ज्यामधून ते फेसबुक ID, लोकेशन, ईमेल पत्ता आणि वापरकर्त्यांच्या आयपी पत्त्यावर प्रवेश घेतो. नंतर चोरलेली माहिती फ्लायट्रॅपच्या कमांड आणि कंट्रोल सर्व्हरवर हस्तांतरित केली जाते. झिपरियमने (Ziperium) गूगल प्ले स्टोअरद्वारे फ्लायट्रॅप मालवेअर ट्रान्सफर करणाऱ्या तीन धोकादायकअॅप्सबद्दल गूगलला इशारा दिला आहे. त्यानंतर गूगलने अशी धोकादायक अॅप्सचे संशोधन आणि सत्यापन केले आणि त्यांना गूगल प्ले स्टोअरमधून काढून टाकले. जर तुमच्या मोबाईमध्ये खालील अॅप्स असतील तर लगेच डिलीट करा आणि आणि गोपीनियता सुरक्षित ठेवा. (Facebook Account Hack)
Google Play Store वरुन काढून टाकलेली अॅप्स
GG Voucher (com.luxcarad.cardid)
Vote European Football (com.gardenguides.plantingfree)
GG Coupon Ads (com.free_coupon.gg_free_coupon)
GG Voucher Ads (com.m_application.app_moi_6)
GG Voucher (com.free.voucher)
Chatfuel (com.ynsuper.chatfuel)
Net Coupon (com.free_coupon.net_coupon)
Net Coupon (com.movie.net_coupon)
EURO 2021 Official (com.euro2021)