आर. के. लक्ष्मण यांचा “कॉमन मॅन” आता नांदेडच्या विसावा गार्डनमध्ये

नांदेड : प्रसिद्ध व्यंगचित्रकार पद्मविभुषण आर. के. लक्ष्मण (Cartoonist R K laxman) यांच्या नजरेतून साकारलेल्या कॉमन मॅनचा (Caman man) पुतळा आता माता गुजरीजी विसावा उद्यानात (Mata guruji garden nanded) उभारण्यात आला आहे. या कॅमन मॅनच्या पुतळ्याचे अनावरण राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण (Pwd and guardian minister ashok chavan) यांच्या हस्ते करण्यात आले. (R. K. Laxman’s common man is now in Nanded’s park)

 

 यावेळी आमदार अमर राजूरकर, मोहन हंबर्डे, बालाजी कल्याणकर, महापौर मोहिणी येवनकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने आदी मान्यवर उपस्थित होते.

 

नांदेडकरांसाठी चांगली बातमी ; “हा” नंबर डायल करा अन् पोलिसांची मदत घ्या…

नांदेड महानगरामध्ये कॉमन मॅनच्या पुतळ्याची भर टाकू अशा शब्द दिला होता. आर. के. लक्ष्मण यांना मी स्वत: भेटलेलो आहे. सामान्य माणसाच्या नजरेतून एखाद्या घटनेकडे कसे पाहायला पाहिजे, याचे प्रतिक म्हणजे आर. के. लक्ष्मण यांनी रेखाटलेला कॉमन मॅन आहे. या कॅमन मॅनच्या पुतळ्याचे उद्घाटन भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात होणे हे एक प्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूल्यांना वंदन करण्यासारखे असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले. (R. K. Laxman’s common man is now in Nanded’s park)

 

 

यावेळी वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी  ऊन, वारा, पावसापासून संरक्षण करणाऱ्या जागेची उपलब्धी करुन दिली असून त्यांचा अनौपचारिक शुभारंभही पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात नांदेड जिल्ह्यातील व्यंगचित्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांचाही सत्कार करण्यात आला.

 

 

 

महापौर येवनकर यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. व्यंगचित्रकारांतर्फे बाबुराव गंजेवार यांनी आपले मनोगत व्यक्त करुन आर. के. लक्ष्मण यांच्या जीवन कार्याची माहिती दिली. यानंतर पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते स्त्री रुग्णालयातील अत्याधुनिक अल्ट्रा सोनोग्राम मशिन (युएसजी), विशेष नवजात शिशू अतिदक्षता केंद्र, थैलेसिमीया व ऑक्सीजन प्लांटचे उद्घाटन करण्यात आले. (R. K. Laxman’s common man is now in Nanded’s park)

 

 

Local ad 1