पानशेत धरणात कार कोसळली, महिलेचा मृत्यू
पुणे : पानशेत धरण परिसारत रविवारी पर्यटनासाठी गेलेल्या देशपांडे कुटुंबाच्या कारचा टायर फुटल्याने कार पानशेत धरणात कोसळली. (Car crash kills woman in Panshet dam) त्यात कारच्या मागच्या सिटवर बसलेल्या महिलेचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कादवे (ता.वेल्हा जि.पुणे) गावच्या स्मशानभूमी जवळ घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समृद्धी योगेश देशपांडे (वय ३३ ,रा.शनिवार पेठ पुणे ) असे मयत महिलेचे नाव आहे. समृद्धी हिचे पती योगेश देशपांडे (वय ३५) यांना स्वतःचे व मुलगा चिराग देशपांडे ( वय 10) याचे प्राण वाचविण्यात यश आले. पत्नी समृद्धीलाही वाचविण्याचे शर्थिचे प्रयत्न असफल ठरले. (Car crash kills woman in Panshet dam)
पानशेत -शिरकोली रस्त्यावर कादवे गावच्या स्मशानभूमीजवळ कठडे नसलेल्या पुलावरून कार पानशेत धरणात कोसळली. कार चालवत असलेले योगेश देशपांडे हे तत्काळ बाहेर पडले. त्यांना पोहता येत असल्याने त्यांनी पुढील सिटवर बसलेल्या चिरागला बाहेर काढले. मागे बसलेल्या पत्नी समृद्धीला काढण्याचे प्रयत्न केले . परंतु पाण्यामुळे कारचा पाठीमागचा दरवाजा उघडता नव्हता. त्यामुळे काच फोडून सम्रद्धी यांना बाहेर काढण्यात आले. तात्काळ त्यांना पानशेत येथील एका खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र उपचारा पुर्वीच त्यांचा मुत्यु झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. (Car crash kills woman in Panshet dam)