धक्कादायक : बालशौर्य पुरस्कार प्राप्त करतोय मोलमजुरी

नांदेड : बाल वयात शौर्य गाजवणाऱ्या बालकांना राष्ट्रपतींच्या हस्ते बालशौर्य पुरस्काराने (Child Bravery Award) सन्मामनित केले जाते. जिवाची बाजी लावून दोन मुलींचे जीव वाचवणाऱ्या एजाज नदाफला बालशौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. (Child Bravery award to Nadaf Ejaz) मात्र, गरीब परिस्थितीमुळे त्याला मजुरी करावी लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

 

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील असलेल्या पार्डी (Pardi village in Ardhapur taluka of Nanded district) गावाच्या जवळून वाहणाऱ्या नदीच्या बंधाऱ्यात कपडे धुण्यासाठी गेलेल्या चार मुलींना पाण्याचा अंदाज आला नसल्याने त्या पाण्यात बुडू लागल्या होत्या.त्यावेळी नववीत असलेल्या एजाज नदाफने दोन मुलींचे प्राण वाचवण्याचा पराक्रम केला होत. त्यावेळी त्याने मागचा -पुढचा विचार न करता पाण्यात उडी मारून चारपैकी दोघींचे प्राण वाचविले. एका मुलीचे प्रेत पाण्यातून बाहेर काढण्याचे काम एजाज नदाफने केले होते. (Child Bravery award to Nadaf Ejaz)

 

एजाजच्या शौर्याची दखल घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय बालशौर्य पुरस्काराने त्याला गौरविण्यात आले होते. (In recognition of Ejaz’s bravery, he was honored with the National Child Bravery Award by Prime Minister Narendra Modi and President Ramnath Kovind.) त्यावेळी एजाजला सर्व स्थरातून मान – सन्मान मिळाला. सर्वत्र सत्कार करण्यात आला. परंतु त्यानंतर एजाज बारावीत ८२ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाला. (Ejaz passed with 82% marks in 12th standard) परंतु सुरुवातीपासूनच त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिटक आहे. बालशोर्य पुस्कार मिळाल्यानंतर परिस्थिती बदलले, अशी अपेक्षा होती, मात्र, त्यानंतरही घराला आर्थिक मदत करण्यासाठी नदाफला केळी ट्रकमध्ये भरण्याची मजुरी करावी लागत असल्याचे वास्तव समोर आणले आहे. (Nadaf has to fill a truckload of bananas to help the family financially.)

 

एजाजला करायची आहे देशसेवा
राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार मिळालेल्या एजाज नदाफची इच्छा पोलीस किंवा आर्मीत जाण्याची आहे. (Ejaz Nadaf wants to join the police or the army) मात्र, त्याला योग्य मार्गदर्शन मिळत नाही. एजाज बारावीत ८२ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाला आहे. विशेष म्हणजे देशातील सर्व खेळाडू आणि बालशौर्य पुरस्कार प्राप्त असलेल्यांना नोकरीत घेण्याचे प्रावधान आहे. एजाज नदाफने कोणती तरी नोकरी मिळेल, अशी अपेक्षा बाळगून आहे. (Child Bravery award to Nadaf Ejaz)

 

 

Local ad 1