धक्कादायक : नांदेडमध्ये डेल्टा प्लसचा (Delta Plus) शिरकाव

नांदेड : गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या दहाच्या आत आहे. मात्र, आता आलेली बातमी नांदेडकरांची चिंता वाढवणारी आहे. वेगाने प्रसार होणाऱ्या ‘डेल्टा प्लस’चे नांदेडमध्ये दोन रुग्ण आढळले आहेत. (Two Delta Plus patients were found) तर राज्यात एका दिवसांत सर्वाधिक 20 ‘डेल्टा प्लस’ची रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे संपुर्ण राज्यात ‘डेल्टा प्लस’चे एकूण रुग्णसंख्या 65 वर पोहोचली आहे. त्यामुळे नांदेडकरांनो काळजी घ्या. (Delta plus variant in maharashtra 65 patients)

 

राज्यात दररोज कोरोना चाचणीसाठी घेतल्या जाणाऱ्या नमुन्यापैकी काही नुमन्यांची जनमुकीय चाचणी केली जाते. प्रत्येक महिन्याला जिल्ह्यातून 100 नमुन्यांची तपसणी केली जाते. कालपर्यंत सुमारे 45 जणांना डेल्टाप्लसची लागण झाल्याचे समोर आले होते; मात्र बुधवारी आलेल्या अहवालावरून ही संख्या आता थेट 65 वर पोहोचली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याची चिंता वाढला आहे. (Delta plus variant in maharashtra 65 patients)

डेल्टा प्लसची लागण झालेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक संख्या पुरुषांची असून, 32 पुरुष आणि 33 स्त्रियांचा समावेश आहे. याशिवाय डेल्टा प्लसची लागण झालेल्या रुग्णांमध्ये 19 ते 45 वर्षे वयोगटातील तरुणांची संख्या सर्वाधिक म्हणजे 33 आहे. त्या खालोखाल 46 ते 60 वर्षे वयोगटातील बाधितांची संख्या असून ती 17 आहे. तर 18 वर्षाखालील 7 बालकांनाही डेल्टा प्लस’ची लागण झाली असून, त्यांची संख्या सहा आहे. 60 वर्षे वयापुढील 8 जणांनाचा समावेश आहे. (Delta plus variant in maharashtra 65 patients)

Local ad 1