राज्य उत्पादन शुल्कचे (State Excise) अधिकारी व कर्मचारी तडकाफडकी निलंबित
पुणे : हाॅटेल्समध्ये बेकायदा मद्यसाठा राज्यच्या भारारी पथकाला मिळून आला. या प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याच्या ठपका ठेवत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप (Kantilal Umap, Commissioner, Excise Department) यांनी नारायणगाव विभागाचे निरीक्षण आणि इतर तिघांना तडकाफडकी निलंबित केले. यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागात एकच खळबळ उडाली आहे. (State Excise Officers and Employees Suspended)
नारायण उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक जी. डी. कुचेकर, दुय्यम निरीक्षक ए. इ. तातळे, जवान विजय घुंदरे व दिलीप केकरे (Inspector G. D. Kuchekar, Deputy Inspector A. E. Tatale, Jawan Vijay Ghundre and Dilip Kekare) असे निलंबित करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे आहेत. (State Excise Officers and Employees Suspended)
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या राज्य भरारी पथकाने 24 व 25 जुलै रोजी जुन्नर व शिरूर तालुक्यातील परवानाधारक हाॅटेल्समधील मद्यसाठा आणि कागदपत्रांची तपासणी केली. त्यामध्ये विना परवाना वाहतुक करुन आणलेला मद्यसाठा आढळून आला. त्यानंतर पुणे जिल्ह्यातील भरारी पथकांनी शिरूर व जुन्नर हाॅटेल्सचे निरिक्षण केले. त्यात एकुण नऊ ठिकाणी विसंगती व बेकायदा मद्यसाठा आढळून आला. निलंबित निरीक्षक कुचेकर आणि इतर कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याची बाब उघड झाली आहे. तसेच हद्दीतील परवानाधारक हाॅटेल्स व वाईनशाॅपमध्ये मद्यासाठ्याविषयी तपासणी करणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी त्याकडे दुलर्क्ष केल्याचे उघड झाले. (State Excise Officers and Employees Suspended)
राज्याच्या भरारी पथकाने केलेल्या तपासणीत विनाहाहतूक परवाना नसलेल्या साठा मिळाला. त्यामुळे शासनाचे महसुल बुडवण्याचा हेतू स्पष्ट होत आहे. तसेच निलंबित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपले कर्त्वव्य बाजवले नाही. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतिलाल उमाप यांनी निलंबनाचे आदेश जारी केले आहेत.
बेकयादा मद्यसाठा व विसंगती आढळलेले हाॅटेल्स
हाॅटेल आर.जी. मलठण ता. शिरूर : विदेशी मद्य 74 बाॅक्स व बियरचे 37 असे एकूण 111 बाॅक्स आढळले.
हाॅटेल आयुष, राजंनगाव ता. शिरूर : विदेशी मद्य 80 व बियर 100 बाॅक्स असे एकुण 180 बाॅक्स विनावाहतुक पासचा साठा आढळला.
मे. हाॅटेल पल्लवी, राजंनगाव. ता. शिरूर : विदेशी मद्याची 37 व बियरचे 20 बाॅक्स असे एकूण 57 बाॅक्स मिळून आले.
हाॅटेल जभवानी, ता. शिरूर : विदेशी मद्याचे पाच बाॅक्स व दहा बियरचे बाॅक्स मिळाले.
दिपक परमिट रुम, जुन्नर : विविध कंपन्यांचे 12 बाॅक्स मिळून आले.
मे. पुनम परमिट रुम,ता. जुन्नर : विविध कंपन्यांच्या 88 बाॅक्स मिळून आले.
मे. कपील परमिट रुम, जुन्नर : विविध कंपन्यांचे 7 बाॅक्स मिळून आले.
मे. के.पी. मिसाळ, जुन्नर : नोंदीमध्ये निसंगती आढळून आली.
मे. हाॅटेल प्रशांत , नारायणगाव : हिशोबाच्या नोंदवह्या, परिवहन पास व शेरेपुस्तक, परवाना प्रत, नंजूर नकाशा संबंधित चलकाला मागणी केली असता, ते सादर करु शकले नाही.