नागरिकांचे (citizens) आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी परिसर स्वच्छ ठेवा : प्रणिताताई देवरे चिखलीकर
नांदेड : कंधार तालुक्यातील काटकळंबा येथे गेल्या चार दिवसांपासून अतिवृष्टीमुळे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना,अंगणवाडी परिसरात पाणी साचले आहे. त्यातून आरोग्याच्या प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असून, तात्काळ पाण्याचा निचरा करा, नागरिकांच्या आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी परिसर स्वच्छ ठेवा, असे आवाहन भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा तथा जिल्हा परिषद सदस्या प्रणिताताई देवरे चिखलीकर (Pranitatai Deore-Chikhlikar) यांनी केले आहे. (Keep the premises clean for the health of the citizens: Pranitatai Deore-Chikhlikar)
प्रणिताताई देवरे चिखलीकर यांनी काटकळंबा येथे भेट देऊन नागरिकांशी संवाद साधत गावची पहणी केली. तसेच समस्या जाणून घेत त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही दिले. यावेळी शंकरराव नाईक, पंचायत समिती सदस्य संजय देशमुख, सरपंच कोंड्याबाई माधवराव बस्वदे,उपसरपंच शिवाजी दिगंबरराव वाकोरे, भाजपा युवामोर्चा तालुका अध्यक्ष साईनाथ कोळगीरे, सय्यद नवाज उपस्थित होते. (Keep the premises clean for the health of the citizens: Pranitatai Deore-Chikhlikar)
यावेळी ग्रामपंचायत सदस्य माधव पाटील वाकोरे, रंजना माधव कांबळे, शैलेजा जितेंद्र चावरे, पद्मिनी गजानन कांबळे, गोविंदअप्पा हाम्पले, माधवराव पाटील बस्वदे, व्यंकटराव पाटील लोहकरे, बालाजी पाटील बस्वदे, रामचंद्र पाटील बस्वदे, मोहन पाटील पवार, रावसाहेब पाटील बस्वदे, गजानन पाटील वाकोरे, शिवाजी पाटील पानपट्टे, उत्तमराव पाटील बस्वदे, रमेश पाटील बस्वदे, अमोल पाटील पानपट्टे, कैलास पाटील वाकोरे, दत्ता पाटील हंबर्डे, बळीराम गोरकवाड, भाऊसाहेब कांबळे, तुळशीराम चावरे, नरेंद्र चावरे, माधव एकाळे, जिलानी पठाण, आनंदा जुलवाड, शेख आहेमद गुरुजी, समद सय्यद, सलिम पठाण, अमिर पठाण महेमुद सय्यद, महेबुब पठाण, सुभाष चावरे, भुजंग कांबळे, बालाजी कन्नेवार, काशिम पठाण,सह गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Keep the premises clean for the health of the citizens: Pranitatai Deore-Chikhlikar)
दरम्यान, प्रणिताताई देवरे चिखलीकर यांनी सरपंच कोंड्याबाई माधवराव बस्वदे, उपसरपंच शिवाजी दिंगबर वाकोरे, ग्रामपंचायत सदस्य अशोक चावरे, गजानन कुठारे, वजीर पठाण यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांच्या घरी सदिच्छा भेट देऊन चर्चा केली.