राज्यात पुराचे थैमान (Floods in the state); आता मुंबईत ऑरेंज अलर्ट

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या विविध भागात पावसाने थैमान घातले असून, नदी-नाले एक झाले आहेत. कोकणातील चिपळून पुर्णपणे पाण्याखाली गेले आहे. आता पाऊसाने विश्रांती घेतल्याने आता पुराचे पाणी ओसरायला लागले आहे. (Chiplun in Konkan is completely submerged. Now that the rains have stopped, the floodwaters are receding.) मराठवाड्यातील गोदावरी, दुधना या मुख्य नद्यांसह अन्य नद्याही दुथडी भरून वाहत आहेत. (Godavari, Dudhna and other rivers in Marathwada are also overflowing) नदीकाठच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विदर्भातील अकोला जिल्ह्यातही पावसाने कहर केले आहे. तर दुसरीकडे हवामान विभागाने आता शुक्रवारी मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी केला. त्यामुळेकाही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. (Floods in the state, now Orange Alert in Mumbai)

 

कालपासून मुंबईत पावसाचा जोर काहीसा ओसरला. 24 आणि 25 जुलै रोजी मुंबईत यल्लो अलर्ट देण्यात आला आहे. आज मुंबईत जोरदार वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर आज शुक्रवारसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. (The rains have eased in Mumbai since yesterday. A yellow alert has been issued in Mumbai on July 24 and 25. Strong winds are expected in Mumbai today. So today the Orange Alert has been issued for Friday.)

 

 

गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला आहे. जोरदार पडत असलेल्या पावसामुळे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सौंदलगा हद्दीत वेदगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. मध्यरात्री पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग वर पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे. सद्यस्थितीत महामार्गावरून वाहत आहे. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक थांबली आहे. कोल्हापूर येथून बेळगावकडे जाणारी कार व ट्रक पाण्यातच अडकून पडले होते. यावेळी रस्ते देखभाल करणाऱ्या जयहिंद कंपनीसह पोलिस प्रशासनाने शर्यतीच्या प्रयत्नाने कारमधील ५ व ट्रक मधील ३ अशा ८ जणांना सुखरूप बाहेर काढले. (Floods in the state, now Orange Alert in Mumbai)

 

 

दरम्यान अत्यावश्यक सेवेसाठी म्हणून तहसील प्रशासनाने चिकोडी येथे राखीव असलेल्या एनडीआरएफ तुकडीला पाचारण केले. सकाळी दहानंतर प्रत्यक्षात अत्यावश्यक सेवा तसेच रुग्णांना सेवा दिली जाणार आहे. दोन्ही बाजूला पोलीस प्रशासनाने बॅरिकेड्स व आदी साहित्य लावून नागरिकास वाहनांना प्रवेश बंद केला आहे. एनडीआरएफ पथक येऊन पाहणी केल्याशिवाय कोणत्याही नागरिकांना व वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. राष्ट्रीय महामार्गावर पाणी आल्याने कोल्हापूरहून बेळगावकडे होणारी वाहतूक कोगनोळी सीमा तपासणी नाका येथून तर बेळगावहून कोल्हापूर व पुणे मुंबईकडे होणारी वाहतूक महामार्गावरील तवंदी घाट येथील शिपूर फाटा येथून मागे वळविण्यात येत आहे. (Floods in the state, now Orange Alert in Mumbai)

 

 पावसाने विश्रांती घेतल्याने महाडकरांना काहींसा दिलासा मिळाला असून,महाड मधील पूरस्थिती ओसरण्यास सुरूवात झाली आहे. सावित्री नदीची पूर पातळी मध्यरात्री १ वाजता १०.५० मीटरवर पोहोचली होती. एनडीआरएफ, तटरक्षक दल, कोलाड येथील रिव्हर राफ्टींग टीम्स महाड परिसरात दाखल झाल्या आहेत. नौदलाचे पथकही महाड येथे पोहोचले आहे. तटरक्षक दलाची हेलिकॉप्टर्स महाड मध्ये दाखल झाली आहेत. त्यामुळे मदत व बचाव कार्याला सुरवात झाली आहे. (Floods in the state, now Orange Alert in Mumbai)

 

अमरावती विभागातील पाचही जिल्ह्य़ांत सर्वदूर पाऊस सुरू असून, अकोला जिल्ह्य़ात पावसाची तीव्रता अधिक आहे. विभागात गेल्या चोवीस तासांत बारा तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. सर्वाधिक १६८ मि.मी. पाऊस अकोला जिल्ह्य़ातील बार्शीटाकळी तालुक्यात नोंदवण्यात आला. अमरावती जिल्ह्य़ातील चिखलदरा तालुक्यात सिपना नदीला पूर आला असून ती धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे.

 

परभणी जिल्ह्यातील गोदावरी, दुधना या मुख्य नद्यांसह अन्य नद्याही दुथडी भरून वाहू लागल्याने नदीकाठच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील खराब रस्त्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून आजारी व्यक्तींना उपचारार्थ  जिल्ह्यात तब्बल ३२ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची माहिती परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली. सेलू तालुक्यातील मुख्य रस्ते बंद झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. लोअर दुधना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने दुधना काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. पालम तालुक्यातील गळाटी, लेंडी या नंद्यांना पूर आल्याने १४ गावांचा संपर्क तुटला आहे. आरखेड, पुयणी, आडगाव, फळा, फरकंडा, घोडा, वनभुजवाडी या गावांच्या शिवारामध्ये पुराचे पाणी घुसल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. (Floods in the state, now Orange Alert in Mumbai)

 

 

Local ad 1