धक्कादायक : नांदेडसह नऊ जिल्ह्यांत गर्भपाताचे औषध विक्री (Shocking)
मे. मेट्रो फार्माची मालकीन मालती भोरगेसह पाच जणाविरुद्ध गुन्हा
नांदेड Nanded : नांदेडसह राज्यातील नऊ जिल्ह्यांत गर्भपाताचे औषधे बेकायदा विक्री करणाऱ्या मे. मेट्रो फार्माची मालकीनसह पाच जणांविरोधात नांदेडच्या भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे नांदेडसह अन्य शहरातील वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
गर्भपाताचे औषध ए-कारे किटची (Abortion medicine A-care kit) नांदेड शहरासह यवतमाळ, उस्मानाबाद, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, पुणे, सातारा (Yavatmal, Osmanabad, Beed, Parbhani, Hingoli, Latur, Pune, Satara including Nanded city) या जिल्ह्यातील डॉक्टर व औषध विक्रेत्यांना बेकदायदा पुरवठा करणाऱ्या नांदेडच्या मे. मेट्रो फार्माची मालकीन मालती भोरगेसह पाच जणाविरुद्ध भाग्यनगर पोलिस ठाण्यात (bhagyanagar police station nanded) गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (Shocking: Sale of abortion drugs in eight districts including Nanded)
नांदेडमध्ये मालती दिपक भोरगे यांचे मे. मेट्रो फार्मा (May Metro Pharma)नावाची ओषधे पुरवठा करणारी एंजन्सी आहे. त्यांच्याकडे असलेल्या फार्मासिस्ट प्रकाश सुदाम लोखंडे व डी.के.टी. इंडीया (D.K.T.India)या कंपनीचा वैद्यकीय प्रतिनिधी बुध्दानंद थोरात, मयुर लोले व मयुर वेलापुरे यांनी संगनमत करुन ए-कारे किट या गर्भपाताचे औषधाची मोठया प्रमाणावर खरेदी विक्री केल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक मा. ज. निमसे यांनी मे. मेट्रो फार्मामध्ये छापा टाकून खरेदी-विक्रीची तपासणी केली. (Shocking: Sale of abortion drugs in eight districts including Nanded)
दुकानदाराने ए-कारे किट या गर्भपाताचे औषधाची मोठया प्रमाणावर खरेदी विक्री केल्याचे आढळून आले. दुकानदाराने यवतमाळ, उस्मानाबाद, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, पुणे, सातारा या जिल्ह्यातील डॉक्टर व औषध विक्रेत्यांना औषधाचा पुरवठा केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यामुळे संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्त औषधे यांना डॉक्टराकडे पुढील चौकशी करुन अहवाल देण्याची विनंती करण्यात आली. त्यात मे. मेट्रो फार्मा नांदेड यांनी प्रशासनाला सादर केलेली गर्भपाताच्या औषधाच्या विक्री बिले खोटी व बोगस आढळून आले असून डॉक्टरांना औषधी पुरवठा झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. (Shocking: Sale of abortion drugs in eight districts including Nanded).