नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊसाचा अंदाज (Heavy rains)

नांदेड  : राज्यात सर्वत्र पाऊस होत असून, मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या माहितीनुसार  दि.19, 22 व 23 जुलै या काळात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी दिली. (Heavy rains forecast in Nanded district)

 

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्व कल्पना असल्याने नागरिकांनी बाहेर जाणे टाळावे. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसावे. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्यावा. घराची बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नये. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद कराव्यात. ताराचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूपासून दूर रहावे. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडावे. Heavy rains forecast in Nanded district

 

आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नये. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईप लाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करण्याचे टाळावे. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूत किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नये. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नये. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्या इतकेच धोकादायक आहे, असेही आवाहन नांदेड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे. Heavy rains forecast in Nanded district

 

 

Local ad 1