स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) खातेदार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची
मुंबई : आर्थिक व्यवाहरात पार्दर्शकपणा असली पाहिजे, यासाठी काही बाबी महत्वाच्या असतात. त्यात आपल्या बँक खात्याशी पॅन-आधार कार्ड (पॅन-आधार) लिंक असने आवश्यक आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या सर्व ग्राहकांना नोटीस बजावली आहे. त्यांना ग्राहकांना महत्वाची सूचना दिली. बॅकिंग सेवा अखंडीत ठेवण्यासाठी सूचनांचे पालन करा, असे एसबीआय बँकेने आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेले नोटीसीमध्ये म्हणटले आहे. (PAN-Aadhar Card (PAN-Aadhar) must be linked to a SBI bank account)
आधार कार्डशी पॅनकार्ड असे जोडा
आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट incometaxindiaefiling.gov.in वर लॉगिन करा. इथे तुम्हाला आधार लिंक करण्याचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुमचा पॅन नंबर, आधार क्रमांक, तुमचे नाव खाली असलेल्या बॉक्समध्ये भरा. यानंतर कॅप्चा कोड काळजीपूर्वक पाहा आणि बॉक्समध्ये भरा. सर्व माहिती भरल्यानंतर आधारशी लिंक अशा पर्यायावर क्लिक करुन प्रक्रिया पुर्ण करता येईल. (PAN-Aadhar Card (PAN-Aadhar) must be linked to a SBI bank) account