पुणे पावसाळी पर्यटनासाठी (Rainy season tourism) चांगला पर्याय ; पण आता थोडं थांबा.!

पुणे ः  पावसाळी पर्यटनासाठी पुणे जिल्ह्यात चांगले पर्याय आहेत. तुम्ही यापुर्वी आला असाल. आता पुन्हा येण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा. (Pune is a great option for rainy season tourism, but wait a minute!) कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे पावसाळी पर्यटनाला बंदी आहे. (Rainy season tourism is banned) त्यामुळे पर्यटनस्थळापर्यंत तुम्हांला जाता येणार नाही. जर जाण्याचा कोणी प्रयत्न केल्यास त्यांना पोलिसांच्या दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागत आहे. (Pune rural police)

 

 पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरण, सिंहगड किल्ला परिसरात फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना पोलिसांनी प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड ठोठावला आहे. पर्यटनस्थळांवर कोणीही नियम मोडून फिरण्यासाठी येऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. तरीही पर्यटक येत असल्याने पोलिसांनी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. पुणे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी बंद आहेत. (Pune is a great option for rainy season tourism, but wait a minute!

 

गेल्या रविवारी सिंगहगडावर पर्यटकांची झालेली गर्दी आणि त्यामध्ये झालेले कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन या पार्श्वभूमीवर हवेली पोलिसांकडून या आठवड्यात नियम मोडून येणाऱ्या पर्यटकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. शनिवार व रविवार या दोन दिवसांत ७७ जणांवर दंडात्मक कारवाई करत  त्यांच्याकडून तब्बल ८८ हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. (Pune is a great option for rainy season tourism, but wait a minute!

पुणे जिल्ह्याचा ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे पावसाळी पर्यटनासाठी होणारी गर्दी कमी करा, वेळप्रसंगी कठोर कारवाई करा, अशा सक्त सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. The prevalence of corona is increasing in rural areas of Pune district. Therefore, the crowd for monsoon tourism should be reduced and strict action should be taken, such strong instructions have been given to the administration by Deputy Chief Minister and Guardian Minister Ajit Pawar.

सिंहगड रस्त्यावरील डोणजे फाटा, गोळेवाडी चेक पोस्ट, नांदेड फाटा, खडकवासला धरण चौक, खेड शिवापूरकडून येणाऱ्या कोंढणपूर फाटा अशा ठिकाणी कडक बंदोबस्त आणि नाकाबंदी करण्यात येत आहे. दंडात्मक कारवाई बरोबरच आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम १८८ नुसार गुन्हाही दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यटनासाठी येण्यापुर्वी विचार करुन या.. (Pune is a great option for rainy season tourism, but wait a minute!
Local ad 1