मला एकनाथ खडसेंच्या सीडीची (CD) प्रतिक्षा : राज ठाकरे
पुणे | भोसरी भूखंड प्रकारणात राज्याचे माजी महसूल मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (ncp leader eknath khadse) यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) (Enforcement Directorate) नुकतेच चौकशीसाठी बोलावले होते. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यामागे ‘ईडी’ लावली तर मी सीडी बाहेर काढेन, से वक्तव्य खडसे यांनी केले होते. मी आता एकनाथ खडसे सीडी कधी बाहेर काढतात, याचीच वाट पाहत आहे, (I am waiting for Eknath Khadse’s CD) असे सांगत ठाकरे यांनी भाजपवर निशाना साधला.