हत्तीरोगाचा प्रसार कसा होतो ? त्यावर उपचार काय आहेत ? हे तुम्हांला माहित आहे का ? (Did you know)

नांदेड : हत्तीरोग म्हणजे पाय हत्तीसारखा होणे, ही स्थिती शेवटच्या स्टेजमध्ये होत असते. परतु आपण हत्तीरोग होऊच नये यासाठी प्रयत्न केल्यास त्याला दोन हात लांब ठेवू शकतो का?,, त्यासाठी आपल्याला काय? काळजी घ्यावी लागेल. हत्तीरोग कशामुळे होतो?, त्याची कारणे काय आहेत?, ते होण्यापासून आपण स्वतःला, आपल्या परिवाराला आणि गावाला वाचवू शकतो का?, अशा विविध आपल्या मनात प्रश्नांची उत्तरे देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. How is elephantiasis spread? What are the treatments for it? Did you know that

 

रोगकारक घटक
हत्‍तीरोगाचा प्रसार सुतासारखा दिसणा-या परोपजीवी कृमींमुळे होतो. भारतामध्‍ये ९८ टकके रुग्‍णांमध्‍ये हत्‍तीरोगाचा प्रसार बुचेरिया बॅनक्रॉप्‍टी या परोपजीवी कृमींमुळे झालेला आढळून येतो. भारतातील २५० जिल्‍हयांमध्‍ये स्‍थानिक स्‍वरुपात लागण झालेल्‍या हत्‍तीरोग रुग्‍णांची नोंद आहे. (Elephantiasis has been reported in 250 districts in India)

 

हत्तीरोग कोणाला होऊ शकतो..? Who can get elephantiasis?
वय – सर्व वयोगटांमध्‍ये हत्‍तीरोगाची लागण होऊ शकते.
लिंग – स्‍त्री किंवा पुरुष दोघांना हत्‍तीरोग होऊ शकतो. मात्र हत्‍तीरोगाचा प्रादुर्भाव असणा-या क्षेत्रात पुरुषांमध्‍ये हत्‍तीरोगाचे प्रमाण जास्‍त दिसून येते.
स्‍थलांतरीत लोकसंख्‍या – काम व इतर कारणांमुळे वारंवार स्‍थलांतर करणा-या लोकांमुळे एका भागातून दुस-या भागात हत्‍तीरोगाचा प्रसार होतो.
रोगप्रतिकार शक्‍ती – हत्तीचरोगाच्या रोगप्रतिकार शक्‍तीबाबत अदयाप निश्चित माहिती उपलब्‍ध नाही.
सामाजिक कारणे – वाढते शहरीकरण, औदयोगिकीकरण, लोकांचे एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी होणारे स्‍थलांतर, अज्ञान , गरीबी आणि अस्‍वच्‍छता.

 

पर्यावरणीय घटक
वातावरण- २२ ते ३८ डिग्री सेंटीग्रेड तापमान आणि ७० टक्‍के आर्द्रता ही क्‍युलेक्‍स डासांच्‍या वाढीसाठी पोषक असते. क्युलेक्सख डासांची उत्पात्तीत घाण, प्रदुषित पाण्याोत खूप मोठया प्रमाणात होते. अयोग्यण पध्दोतीची गटारे, शहरांचे व गावांचे अयोग्य आणि अपुर्ण नियोजन, सांडपाण्याचा अयोग्यं पध्दरतीने होणारा निचरा या सर्व बाबींमुळे क्यु्लेक्सप डासांची उत्पपत्तीा खूप मोठया प्रमाणात होते आणि त्यागमुळे हत्तीवरोगाचा प्रसार व प्रादुर्भाव वाढतो.

 

असा होतो रोगाचा प्रसार This is how the disease spreads
दुषित डास चावल्‍यामुळे हत्‍तीरोगाचा प्रसार होतो. (क्‍युलेक्‍स प्रकारचे डास बुचेरेरिया बॅनक्रॉप्‍टीया हत्‍तीरोगाच्‍या परोपजीवी जंतूचा प्रसार करतात.) दुषित डास मनुष्‍याला चावा घेतेवेळी त्‍या ठिकाणी हत्‍तीरोगाचे जंतू सोडतो. हा जंतू त्‍या ठिकाणाहून किंवा अन्‍य ठिकाणाहून त्‍वचेतून शरीरात प्रवेश मिळवितो आणि लसीका संस्‍थेमध्‍ये जातो.

 

रोग लक्षणाच्या ४ अवस्‍था आहेत There are 4 stages of the disease

जंतू शिरकावाची अवस्‍था- यामध्‍ये आजाराबाबत लक्षणे दिसू शकतात.
लक्षणविरहीत – यामध्‍ये रुग्‍णांचा रात्रीच्या रक्‍तनमूना तपासणीत मायक्रो फायलेरिया (mf) आढळून येतात. मात्र रुग्‍णांमध्‍ये रोगाची कोणतीही लक्षणे व चिन्‍हे आढळून येत नाहीत.
तीव्र लक्षणे – ताप, लसीकाग्रंथीचा दाह, लसीकाग्रंथीना सूज तसेच पुरुषांमध्‍ये वृषणदाह इ. लक्षणे दिसून येतात.
दिर्घकालीन संसर्ग – हात, पाय व बाहय जननेंद्रियावर सूज, अंडवृध्‍दी इ. लक्षणे दिसतात.

 

असे करतात निदान Diagnosis
हतीरोग जंतूच्या विशिष्ट सवयीमुळे हे जंतू मानवी रक्तात रात्री मोठ्या प्रमाणात आढळतात त्यामुळे रात्री ८.३० ते १२ दरम्‍यान रक्‍तनमूना घेऊन तपासणी केल्‍यानंतर हत्‍तीरोगाचे निदान करता येते.

 

औषधोपचार Medication
ज्‍या रुग्‍णांमध्‍ये मायक्रो फायलेरिया (microfilaria) आढळून येतात. अशा रुग्‍णांना डीईसी (डायइथील कारबामाझाईन) या गोळया ६ मिलिग्रॅम प्रतिकिलो शरीराचे वजन (प्रौढ व्यक्‍ती ३०० मिलीग्रॅम ) या प्रमाणात १२ दिवस देण्‍यात येतात. रुग्‍णांने पायाची स्‍वच्‍छता करणे आणि काळजी घेणे तसेच शारीरिक व्‍यायाम करणे हे महत्‍वाचे असते. हत्‍तीरोगाची तीव्र लक्षणांसाठी वैद्यकीय सल्ल्याने योग्‍य उपचार घेणे आवश्‍यक असते. (Appropriate treatment should be taken with medical advice) हत्‍तीरोग नियंत्रणासाठी प्रतिबंधात्‍मक उपाययोजना महत्‍वाच्‍या आहेत.

 

एक दिवसीय सामुदायिक औषधोपचार
हत्‍तीरोगाचा प्रसार रोखण्‍यासाठी हत्‍तीरोग समस्‍याग्रस्‍त लोकसंख्‍येमध्‍ये २ वर्षाखालील मुले, गर्भवती स्ञिया व गंभीर आजारी रुग्‍णांना वगळून सर्वाना वर्षातून एकदा एकाच वेळी डीईसी गोळया खाऊ घालणे महत्‍वाचे आहे. ही मोहिम किमान पाच वर्षे राबविल्यास हत्‍तीरोगापासून मुक्त होऊ शकतो. If implemented for five years, elephantiasis can be cured

 

आठवड्यात एक दिवस कोरडा पाळावा..
रोगाचा संसर्ग रोखण्‍यासाठी आणि डास नष्ट करण्‍यासाठी साचलेल्‍या पाण्‍यात गप्‍पीमासे सोडावेत. पाण्‍याच्‍या टाक्‍या, रांजण, बॅरल, हौद यांना व्‍यवस्थित झाकणे बसवावीत. कापडाने झाकावीत, वेळोवेळी त्‍यांची स्‍वच्‍छता करावी. आठवडयातून एक दिवस कोरडा पाळावा. Did you know

 

हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहिम जिल्ह्यात 1 ते 15 जुलै दरम्यान राबविण्यात येत आहे. या मोहिमेत आरोग्य खात्यातील अधिकारी व कर्मचारी हे घरोघरी जावून डिईसी व अलबेंडाझॉल गोळयाची एक मात्रा खाऊ घालत आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी या मोहिमेस प्रतिसाद देऊन हत्तीरोगापासून मुक्त रहावे.
  – डॉ. विपीन इटनकर, जिल्हाधिकारी, नांदेड

 

 

 

 

Local ad 1