मुख्यमंत्री महाआरोग्य (Maha Arogya) कौशल्य विकास प्रशिक्षणाला सुरुवात
मंत्रालयातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला शुभारंभ
पुणे : कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण हा कार्यक्रम सुरू केला आहे. मुंबई येथे कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने झाले. CM launches Maha Arogya Skills Development Training
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री सुभाष देसाई, आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, आयुक्त दिपेंद्रसिंह कुशवाह उपस्थित होते. पुणे जिल्ह्यातून सदर कार्यक्रमामध्ये जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, बी.जे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहायक आयुक्त अनुपमा पवार, यांच्यासह महाविद्यालयाचे डॉक्टर आणि कौशल्य विकास योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेणारे उमेदवार सहभागी झाले होते. CM launches Maha Arogya Skills Development Training
जिल्ह्यामध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध असणाऱ्या शासकीय खाजगी दवाखाने आणि वैद्यकीय संस्थांमध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येणार असून, त्याद्वारे आरोग्य क्षेत्रामध्ये कुशल मनुष्यबळ तयार होण्यास मदत होणार आहे. सध्या जिल्ह्यातील चार शासकीय व सात खाजगी इस्पितळे/ वैद्यकीय शिक्षण संस्था यांनी या योजनेमध्ये सहभाग नोंदवला आहे. यापैकी ससून सर्वोपचार रुग्णालय-बी.जे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे फ्लेबोटामिस्ट, सिल्वर बर्च हॉस्पिटल येथे हॉस्पिटल फ्रंट डेस्क कॉर्डिनेटर, तर ओम चैतन्य हॉस्पिटल येथे जनरल ड्युटी असिस्टंट या कोर्सचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. CM launches Maha Arogya Skills Development Training