5 हजाराच्या लाचेची मागणीकनिष्ठ लिपीका विरुद्ध गुन्हा दाखल

पुणे (MH टाईम्स): पोलिस बंदोबस्त पुरविण्यासाठी 15 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणार्‍या एका कनिष्ठ लिपीकावर (junior clerk) भ्रष्टाचार प्रतिबंधक (The Prevention of Corruption Act) अधिनियम कलम 7 नुसार दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार उप विभागीय पोलिस अधिकारी कार्यालय दौंड येथे घडला आहे.
सुरेश रमाकांत कदम (वय-34) (SURESH RAMAKANT KADAM) असे गुन्हा दाखल झालेल्या लिपीकाचे नाव आहे. तक्रारदार यांनी शिरुर येथील त्यांच्या जमीनीची हद्द कायम करण्यासाठी पोलिस संरक्षण मिळावे, यासाठी उप विभागीय पोलिस अधिकारी कार्यालय दौंड येथे अर्ज केला होता. तक्रारदार यांना कदम याने 15 हजाराच्य लाचेची मागणी केली.
कोट
लाच देण्याची इच्छा नसलेल्या तक्रारदारांने लाचतुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) 18 डिसेंबर 2020 रोजी तक्रार अर्ज दाखल केला होता.त्यानुसार दाखल तक्रार अर्जाची खातरजमा करण्यात आली. त्यात कदमने 15 हजाराच्या लाचेची मागणी केल्याचे समोर आले. त्यानुसार 5 जानेवारी रोजी कमद याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Local ad 1