“आपल्या मागे ED लावल्यास आपण सीडी लावू” असे म्हणणाऱ्या Eknath khadse यांच्या जावायाला इडीकडून अटक
पुणे ः एकनाथ खडसे यांनी (Eknath khadse) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करताना आपल्यामागे ईडीचा (ED ) ससेमिरा लागण्याची शक्यता व्यक्त केली होती. मात्र, भाजपाने ईडी लावली तर आपण सीडी लावू, असा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला होता. आता खडसे यांचे जावाई गिरीश चौधरी (girish choudhari) यांना ईडीने अटक केली आहे. ED arrests Eknath Khadse’s son-in-law
NCP leader Eknath Khadse's son-in-law was arrested in the Pune land deal case yesterday. He was called for questioning and later placed under arrest: Enforcement Directorate
— ANI (@ANI) July 7, 2021
एकनाथ खडसे याआधी राज्याचे महसूल मंत्री होती. जमीन घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती दिनकर जोतिंग यांच्या अध्यक्षतेखाली न्यायिक आयोग स्थापन करण्यात आली होता. खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे व जावाई गिरीश चौधरी यांनी २८ एप्रिल २०१६ रोजी भोसरी एमआयडीसी येथील सव्र्हे क्र. ५२/२ अ ही जमीन अब्बास रसुलभाई उकानी नामक मूळ जमीनमालकाकडून ३.७५ कोटी रुपयांना खरेदी केली. नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात या व्यवहाराची रीतसर नोंद केली. अशा प्रकारे एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या व त्यांच्या मालकीच्या जमिनीचे खडसे कुटुंबीय सरकारी कागदोपत्री मालक झाले.