(One lakh) संगमनेर उपविभागीय वन अधिकारी लाखाची लाच घेताना जाळ्यात

अहमदनगर  : गावातील पूर्वी वनक्षेत्रात येत असलेली शेतजमीन ही निर्वनीकरणाचा अहवाल देण्यासाठी एक लाख रुपयांची लाच स्विकारणारा संगमनेरचा उपविभागीय वन अधिकारी विशाल बोऱ्हाडे हा लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात अलगद सापडला आहे. बोऱ्हाडेला आळेफाटा (ता. जुन्नर) येथून अटक करण्यात आली. Sangamner Sub-Divisional Forest Range Officer arrested for accepting bribe of Rs one lakh

डोळासने (ता. संगमनेर, जि. अहमदनगर) गावातील पूर्वी वनक्षेत्रात येत असलेली शेतजमीन ही निर्वनीकरण झाल्याबाबतचा अभिप्राय असलेला अहवाल जिल्हाधिकारी यांनी मागितला हाेता. ताे अहवाल देण्यासाठी बोऱ्हाडे यांनी अर्जदाराकडे  एक लाख रुपयांची मागणी केली होती. Sangamner Sub-Divisional Forest Range Officer arrested for accepting bribe of Rs one lakh

तक्रादाराने  नाशिक दौऱ्यावर असलेल्या वनराज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्याकडे तक्रार केली हाेती. त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला तात्काळ अभिप्राय देण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र अधिकाऱ्याने लाचेची मागणी कायम ठेवली हाेती. शनिवारी (दि. ३) संगमनेरला बोलवून घेत मी पुण्याला जाणार आहे. आळेफाटा येथे मला पैसे द्या, असे बजावला.  किमान ४० हजार आता द्या, असेही असा तगादा बोऱ्हाडेने तक्रारदार यांना लावला होता. अखेर तक्रारदाराने अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. सदर पथकाने तात्काळ आळेफाटा येथे दाखल हाेत सापळा रचून आरोपी विशाल बोऱ्हाडे याला पैसे स्वीकारताना रंगेहात अटक केली. Sangamner Sub-Divisional Forest Range Officer arrested for accepting bribe of Rs one lakh

Local ad 1