The good news : नांदेडची वाटचाल कोरोना मुक्तीकडे
नांदेड : कोरोना चाचणी केली की, बाधित तर येणार नाही ना, अशी भिती चाचणी करणाऱ्या प्रत्येकाच्या मनात असते. नांदेड शहर आणि जिल्ह्यासाठी आज दिवस महत्वाचा ठरला आहे. आज प्राप्त झालेल्या 1 हजार 492 अहवालापैकी 1 हजार 476 निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. आज एकही नवीन पॉझिटिव्ह बाधित आढळलेला नाही. त्यामुळे नांदेडची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने होत आहे. The good news is that Nanded is on its way to the liberation of Corona
जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या ही 91 हजार 231 एवढी झाली असून यातील 88 हजार 597 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 138 रुग्ण उपचार घेत असून 4 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. The good news is that Nanded is on its way to the liberation of Corona